ब्रेकिंग न्यूज
⚡ Pune Accident : कॉलेजला निघालेल्या ७-८ विद्यार्थिनी; बसची वाट बघत असतानाच अंगावर धावून आला काळ, भरधाव कारनं… ✦ ⚡ बुरांडा–खापरी रस्ता मोजतोय अखेरची घटका! ✦ ⚡ मार्डीच्या ‘न्यू युवा समता दुर्गोत्सव मंडळा’चा सामाजिक संदेश देणारा उपक्रम; विसर्जन मिरवणुकीतून पोलिसांच्या कार्याला सलाम! ✦ ⚡ चिंचाळ्यात ‘जय दुर्गा माता महिला मंडळा’चा विविध उपक्रमांतून सामाजिक एकतेचा जागर! ✦ ⚡ 230 झाडांची केली यशस्वी लागवड, 7 लाख रुपयांचा नफा, सोलापुरातील शेतकऱ्याचा भन्नाट प्रयोग ✦ ⚡ सोन्याची चैन दिली, मग गाडी मागितली, 5 लाखांसाठी विवाहितेसोबत नको ते केलं, छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ SA vs AUS : स्मिथचा कॅच हवेत, ब्रीट्झके धावला पण बऊमाने तोंड फिरवून हे काय केलं? आफ्रिकेच्या सनसनाटी विजयाच… ✦ ⚡ पुणेकरांच्या खिशाला कात्री, खासगी आणि स्कूल बसचा प्रवास महागणार, कितीने दर वाढणार? ✦ ⚡ दुष्काळात अमरावतीच्या शेतकऱ्यानं कमाल केली, सोयाबीनसाठी टोकण पद्धत ठरली फायद्याची, मिळालं 26 क्विंटल उत्पन्… ✦ ⚡ अखेर बेपत्ता चिमुकला नाल्यात मृतावस्थेत!
SP News Maregaon

230 झाडांची केली यशस्वी लागवड, 7 लाख रुपयांचा नफा, सोलापुरातील शेतकऱ्याचा भन्नाट प्रयोग

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील अनवली येथील प्रयोगशील शेतकरी अनंत मेटकरी यांनी यंदा पहिल्यांदाच बॉल सुंदरी या विशेष बोरांच्या जातीची लागवड करून शेती क्षेत्रात एक नवीन वस्तुपाठ घालून दिला आहे. पारंपरिक पिकांना फाटा देत त्यांनी पाऊण एकर क्षेत्रामध्ये बॉल सुंदरी बोरांच्या तब्बल 230 रोपांची यशस्वी लागवड केली आहे. यामधून त्यांना निव्वळ 6 ते 7 लाख रुपयांचा नफा मिळणार आहे.

लागवडीपूर्वी जमिनीची योग्य मशागत करून त्यात पुरेसे शेणखत मिसळण्यात आले होते, ज्यामुळे रोपांची उत्तम वाढ झाली. या बोरांवर प्रामुख्याने भुरी आणि आळी या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनंत मेटकरी हेरो हे औषध वापरून दर पाच दिवसांनी नियमित फवारणी करतात. तसेच, पिकाला योग्य प्रमाणात पाणी मिळावे यासाठी दर दोन दिवसांनी चार ते पाच तास पाणी दिले जाते.

सध्या बाजारात बॉल सुंदरी बोरांची आवक आणि विक्री सुरू झाली असून, त्यांना प्रति किलो 70 ते 80 रुपये इतका चांगला बाजारभाव मिळत आहे. मेटकरी यांच्या या पाऊण एकरातील बॉल सुंदरी बोरांच्या बागेतून जवळपास 10 टन इतके भरघोस उत्पादन मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, बॉल सुंदरी बोरांच्या या झाडांची एकदा लागवड केल्यावर पुढील तब्बल 25 वर्षे सातत्याने उत्पन्न मिळत राहते.

पहिल्याच वर्षी लागवड, पाणी, औषधे आणि इतर सर्व खर्च वजा करून निव्वळ 6 ते 7 लाख रुपयांचा नफा मिळण्याचा विश्वास अनंत मेटकरी यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या यशस्वी आणि फायदेशीर प्रयोगामुळे परिसरातील इतर शेतकऱ्यांसाठीही बॉल सुंदरी बोरांची शेती एक नवा आणि दिलासादायक पर्याय ठरत आहे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर