ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

पावसामुळे शेतीचे व मालमत्तेचे नुकसान .

67 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी – युवा कॉग्रेस ची मागणी.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
   [88059 79173]

झरी जामणी :- जुलै महिन्यात झालेल्या  पावसाने व पैनगंगा , खूनी या नदीला आलेल्या पुराने तालुक्यात हजारे हेक्टर जमीन पाण्याखाली गेली.त्यात कोवळे पिक सडून गेले.सततच्या पावसामुळे हजारो हेक्टर क्षेत्र पुरामुळे  खरडून गेली.असून पावसाची रिपरिप सुरूच असून जमीन दलदल झाली आहे . यामुळे उत्पादन घट येण्याची शक्यता आहे.यात चिखलडोह येथे तीन दिवस आधी दोन घरे पडली, पैनगंगा नदी तिरावरचे वेडद पासून खातेरा, बैलमपूर, राजूर, हिरापूर जुने, हिरापूर नवीन, मांगली, गाडेघाट, धानोरा, दुर्भा, पाटण, दिग्रस, कमळवेली, सतपल्ली, वोली, डोरली, टाकळी या भागातील शेकडो हेकटर वरील पिकाचे अतिशय नुकसान झाले.

परंतु अजून प्रशासनाकडून पंचनाम  करण्यात आले नाही, कारण पूरसदृश परिस्थिती अजून कायमच आहे.अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान पाहता ओला दुष्काळ जाहीर करावा, व पुरामुळे झालेले नुकसान झाले आहे, त्यांचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावे करिता युवक काँग्रेस वणी विधानसभा यांचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले, पंचनामे त्वरित न केल्यास रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवक काँग्रेसकडून देण्यात आला आहे.

यावेळी राहुल दांडेकर  अध्यक्ष वणी विधास युवा कॉग्रेस,संदिप बुर्रेवार सभापती कृ . उ. बा. समिती , निलेश येल्टीवार सरपंच दिग्रस , वासुदेव विधाते , हरिदास गुर्जलवार  इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर