ब्रेकिंग न्यूज
Thane ATS News | Namira Khanने बनावट पासपोर्टमध्ये दिलेल्या पत्त्यावर नेमकं कोण राहतंय? | Tariq Khan Vaibhav Sooryavanshi : बुमराहने थोडीही दयामाया दाखवली नाही! 5 बॉल यॉर्करवर यॉर्कर अन् वैभव पायाचा अंगठा वाच… Nagpur : शेअर मार्केटमध्ये झाला लॉस, बँक लुटून केला खर्च ‘कव्हर’, B.SC ग्रॅज्युएट तरुण चोर बनला कसा? VIDEO पंढरपूरमधील माजी सैनिकाची किमया, पशुपालनातून मिळवतोय महिन्याला 1 लाख उत्पन्न, सांगितला यशाचा मंत्र, Video Manoj Jarange Pati आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात Ajay Barskar यांची ED कडे तक्रार घोडदरा येथील दादाजी गोविंदा दुमोरे यांचे निधन मातीशी नातं, सर्जा-राजाशी ऋणानुबंध! कपाशीवर फवारणीचा जोर; विषबाधेचा धोका वाढला! घराला CCTV लावले अन्… जामिनावर सुटलेल्या ‘मुजीब डॉन’चं भयंकर कांड, शेवटी पोलिसांनी उचललंच, छ. संभाजीनगरात… Hingoli Crop Loss News | सोयाबीन वाळलं! चक्क सात एकर सोयाबीनवर रोटावेटर फिरवला
SP News Maregaon

पंढरपूरमधील माजी सैनिकाची किमया, पशुपालनातून मिळवतोय महिन्याला 1 लाख उत्पन्न, सांगितला यशाचा मंत्र, Video

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सोलापूर : देशसेवेचे कर्तव्य बजावल्यानंतरही गप्प न बसता, उद्योग-व्यवसायातून स्वतःची ओळख निर्माण करता येते, हे पंढरपूर तालुक्यातील माजी सैनिक सुभाष राजेंद्र लोखंडे यांनी दाखवून दिले आहे. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी सुरू केलेल्या पशुपालन व्यवसायातून सर्व खर्च वजा करून त्यांना सध्या दरमहा 1 लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळत आहे.

सुभाष लोखंडे यांना लहानपणापासूनच प्राणी आणि पक्ष्यांची आवड आहे. सेवानिवृत्तीनंतर या आवडीचे रूपांतर त्यांनी फायदेशीर व्यवसायात केले. सध्या ते जवळच्या पोलीस ठाण्यात सेवा बजावत असून, त्यांच्या या पशुपालन व्यवसायात त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा मोठा हातभार आहे. लोखंडे यांचा केवळ एकच व्यवसाय नसून त्यांनी विविध प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे संगोपन केले आहे. म्हैस, खिल्लार गाय, शेळी, कोंबडी, बदक आणि राजहंस आहे. गाई आणि म्हशींपासून दररोज तब्बल 200 लिटर दुधाचे संकलन होते.

लोखंडे यांच्या गोठ्याची स्वच्छता दर पाच दिवसांतून एकदा केली जाते. यामागे एक रंजक आणि पर्यावरणपूरक तंत्र आहे. गोठ्यातील शेण कोंबड्या संपूर्ण परिसरात पसरवून भुसभुशीत करतात. त्यामुळे परिसर स्वच्छ राहण्यास मदत होतेच, शिवाय या भुसभुशीत शेणाचा वापर स्वतःच्या शेतात उत्तम दर्जाचे शेणखत म्हणून केला जातो.

आजचा तरुण वर्ग नोकरीच्या शोधात धावपळ करत असताना, माजी सैनिक सुभाष लोखंडे यांनी तरुणांना मोलाचा संदेश दिला आहे. तरुणांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता, लहान का होईना पण प्रामाणिकपणे स्वतःचा व्यवसाय सुरू करावा. चिकाटी आणि प्रामाणिकपणा असेल तर यश नक्कीच मिळते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर