ब्रेकिंग न्यूज
Monsoon Update: हवामान विभागाचा नवा अलर्ट अन् महाराष्ट्राची चिंता वाढली, परतीचा मान्सूननबाबत महत्त्वाचं अपड… द्राक्षबाग काढली अन् पैशाचं पीक लावलं, खर्च 10 हजार, कमाई अडीच लाख, सोलापूरच्या शेतकऱ्यानं काय केलं? Video Sangli: सांगलीत चोरट्यांचा धुमाकूळ, 10 लाखांच्या रोकडसह ‘ATM’ मशीनच पळवलं, मध्यरात्रीच थरार Kalyan: ‘भेटायला बोलवलं, बंदूक दाखवली, भाजपच्या माजी आमदारासह पोलिसाकडून सामूहिक अत्याचार’, तरुणीने तक्रारी… टीम इंडियाच्या एकाच वेळी दोन सीरिज, दोन्ही ठिकाणी निवड झालेला नितीश रेड्डी कुठे खेळणार? Sangli: 2018 सालचं आटपाडी प्रकरण, तीन मुलींसोबत…, 70 वर्षाच्या म्हाताऱ्याला थेट फाशीची शिक्षा, सांगलीत का… Latur Crime : मृत्यूपूर्वी संस्थाचालक संजीव सोनवणे यांच्या डोक्याला टाके, प्रकरणात पुणे कनेक्शन! बहिणीला मु… बाबापुरच्या गणरायाच्या दर्शनासाठी भक्तीचा ओघ वाढतोय! Nigar Sultana : हरमनप्रीतशी पंगा पडला भारी! बांगलादेशच्या कॅप्टनची तातडीने हकालपट्टी, सेमीफायनलमध्ये काय घड… गृहिणी बनली उद्योजिका, 700 कोंबड्यांपासून सुरू केला व्यवसाय, आता महिन्याला 3 लाखांची उलाढाल, Video
SP News Maregaon

द्राक्षबाग काढली अन् पैशाचं पीक लावलं, खर्च 10 हजार, कमाई अडीच लाख, सोलापूरच्या शेतकऱ्यानं काय केलं? Video

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सोलापूर – द्राक्ष पिकातून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने हवालदील न होता, पंढरपूर तालुक्यातील पांढरेवाडीच्या पदवीधर शेतकऱ्याने वेगळा प्रयोग केला. अवघ्या एका एकरामध्ये ‘कवाळे’ शेती करत अडीच ते तीन महिन्यांत तब्बल अडीच लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवला. गणेश तानाजी काळे असं या युवा शेतकऱ्याचं नाव असून त्याने ग्रामीण भागातील तरुणांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.

पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या मागे न धावता गणेशने शेतीत नशीब आजमावण्याचे ठरवले. सुरुवातीला एका एकरात द्राक्षाची बाग लावली; मात्र, मोठा खर्च करूनही हवा तसा फायदा झाला नाही. अखेर धाडसी निर्णय घेत त्यांनी द्राक्षबाग मोडून काढली. जमिनीची उत्तम मशागत करून, शेणखत आणि मल्चिंग पेपरचा वापर करत त्यांनी कवाळ्याची लागवड केली. नागअळी व डंक माशी या रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेळेवर योग्य फवारण्या घेतल्या.

वेळेची गुंतवणूक हेच भांडवल! सांगलीच्या धोत्रे कुटुंबानं डोकं लावलं, लाकडाच्या तुकड्यांपासून फायद्याचा बिझनेस, Video

लागवडीनंतर अडीच महिन्यांनी कवाळे तोडणीस सुरुवात झाली असून, पुढील दीड महिना ही तोडणी सुरू राहते. या भाजीवर्गीय पिकाचा वापर खाण्यासोबतच अमावास्या, पौर्णिमा आणि पूजेसाठी घराबाहेर बांधण्यासाठी केला जातो. गणेशने पिकवलेल्या कवाळ्याची विक्री नवी मुंबईतील वाशी आणि पुणे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत होत आहे. सध्या बाजारात 20 ते 30 रुपये प्रति किलोचा सरासरी दर मिळत आहे.

विशेष म्हणजे या पूर्ण शेतीसाठी गणेशला केवळ 10 हजार रुपयांचा प्राथमिक खर्च आला. आतापर्यंत 12 टन मालाची विक्री झाली असून सर्व खर्च वजा जाता अडीच लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न त्यांच्या पदरात पडले आहे. "तरुणांनी केवळ नोकरीच्या मागे न पळता, आधुनिक व नियोजनबद्ध शेती किंवा स्वतःचा व्यवसाय केल्यास नक्कीच यश मिळते," असा विश्वास गणेश काळे यांनी व्यक्त केला आहे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर