ब्रेकिंग न्यूज
Latur Crime : मृत्यूपूर्वी संस्थाचालक संजीव सोनवणे यांच्या डोक्याला टाके, प्रकरणात पुणे कनेक्शन! बहिणीला मु… बाबापुरच्या गणरायाच्या दर्शनासाठी भक्तीचा ओघ वाढतोय! Nigar Sultana : हरमनप्रीतशी पंगा पडला भारी! बांगलादेशच्या कॅप्टनची तातडीने हकालपट्टी, सेमीफायनलमध्ये काय घड… गृहिणी बनली उद्योजिका, 700 कोंबड्यांपासून सुरू केला व्यवसाय, आता महिन्याला 3 लाखांची उलाढाल, Video Sangli News: चुलत्याच्या गाडीखाली सापडली दोन वर्षाची चिमुकली, सांगलीत मन हेलावणारी घटना Ganpati Bappa: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात? ‘ही’ कथा तुम्हाला माहितीये का? Video Bhau Gang : दोघजणं बाईकवरून आले अन् 15 राऊंड फायरिंग! जिम ट्रेनरचा जागीच मृत्यू, ‘भाऊ टोळी’च्या शार्प शूटरल… बाबापुरच्या गणरायाच्या दर्शनासाठी अलोट गर्दी! पारंपरिक शेतीत केली कोबीची लागवड, शेतकऱ्याचं पालटलं नशीब, अडीच लाख निव्वळ नफा बाबापुरच्या गणरायाच्या चरणी लाखोंची गर्दी!
SP News Maregaon

पारंपरिक शेतीत केली कोबीची लागवड, शेतकऱ्याचं पालटलं नशीब, अडीच लाख निव्वळ नफा

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सोलापूर : नोकरीच्या मागे न धावता शेतीला व्यवसायाची जोड दिली तर मातीतूनही सोनं पिकवता येतं. हे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील उच्चशिक्षित तरुण शेतकरी भारत कृष्ण गायकवाड यांनी सिद्ध करून दाखवले आहे. बी.ए. पर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी शोधण्याऐवजी त्यांनी आपल्या पारंपरिक शेतीत आधुनिक प्रयोग करण्याचा निर्णय घेतला.

भारत गायकवाड यांनी अडीच महिन्यांपूर्वी आपल्या अवघ्या एक एकर शेतात सेंट या जातीच्या कोबीची लागवड केली होती. एक एकर क्षेत्रात साधारण 40 हजार कोबीच्या रोपांची लागवड करण्यात आली. लागवडीपासून ते पीक हाती येईपर्यंत त्यांनी पिकाची योग्य निगा राखली. कोबी पिकावर मुख्यत्वे पडणारा करपा आणि केवडा या रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्यांनी वेळेवर औषध फवारणी आणि खतांचे नियोजन केले.

योग्य व्यवस्थापनामुळे अवघ्या 65 दिवसांत कोबी तोडणीस सुरुवात झाली. आतापर्यंत त्यांच्या शेतातून 20 टन कोबीचे उत्पादन निघाले असून त्याची यशस्वी विक्री झाली आहे. बाजारात कोबीला सरासरी 10 ते 15 रुपये प्रति किलो असा चांगला दर मिळाला. या संपूर्ण पिकासाठी लागवडीपासून तोडणीपर्यंत त्यांना सुमारे 80 हजार रुपये खर्च आला होता. सर्व खर्च वजा जाता भारत गायकवाड यांना अवघ्या तीन महिन्यांत 2 ते 2.50 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळाला आहे.

आज अनेक उच्चशिक्षित तरुण 30 ते 40 हजार रुपयांच्या नोकरीसाठी शहराकडे धाव घेतात. या पार्श्वभूमीवर भारत गायकवाड यांनी तरुणांना महत्त्वाचा संदेश दिला आहे. तरुणांनी नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय किंवा आधुनिक पद्धतीने शेती केल्यास अधिक फायदा होऊ शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या यशाचे परिसरात कौतुक होत आहे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर