14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार.

0
77

बाल लैंगिक अत्याचार पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

एक अल्पवयीन मुलगी रस्त्याने एकटीच जात असल्याचे पाहून तीला आपल्या घरी बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. सदर घटना आज दिनांक 14 डिसेंबर 2022 रोज बुधवारला सकाळी 10 ते 11वाजताच्या सुमारास मारेगाव येथे घडली.अत्याचार झालेल्या पीडितीने आपबीती आपल्या कुटुंबियांना सांगताच तीच्या कुटुंबियांनी मारेगाव पोलीस ठाणे गाठत संबंधीत प्रकरणाची तक्रार दिली.

सविस्तर वृत्त असे की.
अल्पवयीन मुलीगी ही रस्त्याने एकटीच जात असल्याचे पाहून नामे लखन रावत याने आवाज देवुन त्याचे कडे बोलाविले.तो राहत असलेल्या त्याचे घरा जवळ गेली असता लखन याने तिला घरात येण्या करीता सांगीतले. तेव्हा ही पीडिता त्यास येत नाही म्हणुन नकार दीला.

असता लखन याणे पीडितेचा हात पकडुन जबरजस्तीने घरात ओढले व मला त्याचे घरातील खुर्चीवर बसविले त्यानंतर लखन याने जबरदस्तीने पीडितेवर अत्याचार केला.तसेच त्याने तु जर कोनाला काही सांगशील तर तुला सोडनार नाही अशी धमकी दीली.त्या अल्पवयीन पीडितेने सर्व आपबिती आपल्या आई- वडिलांना सांगताच त्यांनी लगेच मारेगाव पोलीसात तक्रार दाखल केली.

असून घटनेचे गांभीर्य ओळखून या प्रकरणी संशियत आरोपी लखन रावत वय सुमारे 20 वर्ष रा.मारेगाव यांच्यावर वर कलम- 376,376(3)506,भादवी सहकलम 4.6 बाललैलिक अत्याचार (पोक्सो ) सह विविध कलमान्वये गुन्हे दाखल  करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली मारेगाव पोलिस करत आहे.



.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here