एक ठार तर दुसरा गंभीर जखमी.
मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]
सविस्तर वृत्त असे की.
मारेगांव तालुक्यांतील सालई पोड (खंडणी) येथील दोन युवक मारेगांव- यवतमाळ राज्य महामार्गाणी जात असताना करणवाडी व खडकीच्या मधात उभ्या ट्रकला दुचाकीची भीषण धडक झाली. ही घटना काल दिनांक 15 डिसेंबर 2022 रोज गुरुवारला सायंकाळच्या सुमारास घडली असून दुचाकीने उभ्या ट्रकला धडक दिल्याने दुचाकीस्वार चालक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.
हरिदास लक्ष्मण टेकाम वय सुमारे 30 वर्ष रा.सालईपोड (खंडणी) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. तर किसन टेकाम वय सुमारे 35 वर्ष रा.सालईपोड (खंडणी) असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते आज दुचाकीने सालई पोड येथुन मारेगाव येथे काई कामानिमित्त जात असताना खडकी बस स्टॉप पासून काही अंतरावर हा अपघात झाला आहे.
त्या मध्ये एक जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला असुन त्यांना काही लोकांनी लगेच मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले येथील डॉक्टरांनी प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे पाठविण्यात आल्याची माहिती सुत्रा कडून प्राप्त झाली आहे. पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे.


