वेणूताई अशोकराव काटवले यांचे हस्ते एकताला श्रीफळ व भेट वस्तु देऊन केला सत्कार.
मारेगांव तालुका प्रतिनिधी:-गजनान देवाळकर
[8888721480]
मारेगाव तालुक्यातील शिवणी (धोबे) येथील कृष्णा प्रल्हाद मेश्राम यांची मुलगी एकताने जिद्द चिकाटीच्या जोरावर यशाचे शिखर गाठले आहे.नागपुर येथे MBBS ला तिचा नंबर लागला असुन विशेष म्हणजे तीचे वडील कृष्णाजी मेश्राम हे श्री संत गजानन महाराज माध्यमिक विद्यालय,नरसाळा येथील शाळेत सेवक पदावर कार्यरत आहे.
त्यांनी आपल्या मुलींना योग्य प्रकारचे शिक्षण दिले आहे.त्यांचे मूळ गाव शिवणी (धोबे)असुन कृष्णाजी यांची मुलगी कुमारी एकता ईचा मेडिकल कॉलेज नागपूर येथे MBBS ला नंबर लागल्याबद्दल श्री संत गजानन महाराज माध्यमिक विद्यालय, नरसाळा येथील संस्थेच्या अध्यक्षा वेणूताई अशोकराव काटवले यांनी एकताच्या घरी जाऊन अभिनंदन केले पुष्प गुच्छ देऊन भावी आयुषच्या शुभेच्छा दिल्या एकता चे प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद शाळा शिवणी (धोबे) येथे ग्रामीण भागात झाले आहे.
व माध्यमिक शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय बेलोरा घाटांजी येथे झाले आहे.मारेगाव तालुका हा इतर तालुक्याच्या तुलनेत काही प्रमाणात मागासलेला समजला जातो परंतु एका ग्रामीण भागातील मुलीने घेतलेली उचं भरारी खरच कौतुकास्पद आहे.म्हणून तिचे विविध स्तरावरून कौतुक केले जात आहे.


