झरी जामणी तालुक्यात मुलींनी माराली बाजी.

0
79

आर्या इंटरनॅशनल स्कुल, मुकूटबन ची जान्हवी झरी तालुक्यातुन प्रथम तर द्वितीय अनुष्का.

शाळेचा निकाल १०० टक्के यशाची परंपरा कायम.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

आर्या इंटरनॅशनल स्कुल, मुकुटबन येथील शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल १०० टक्के लागला असून शाळेच्या दोन विद्यार्थ्यांनींनी तालुक्यातून अनुक्रमे प्रथम व द्वितीय येण्याचा मान पटकाविला.

मार्च २०२३ एस एस सी परीक्षेसाठी शाळेतुन एकूण २१ नियमित विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.त्यापैकी सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये जान्हवी राजेश आंबटवार-९६.२०,अनुष्का मंगेश विंचू-९३.२०,तनश्री सचिन डहाके-९२.०० ,अनुष्का गणेश चिंतावार-९२.०० ,हर्षिका किशोर सीतरलावार-९२.००,आर्यन नारायण दैवलकर-९०.६०,

वेदांत गोविंदराव मद्दूरवार-८८.८०,नाझीया मुस्ताक सैय्यद-८८.००,दुर्गेश राजेश्वर मुद्देलवार-८७.८०,अविनाश जगदीश बाजनलावार-८७.००,आशीका पोतरेड्डी बोमकंटीवार-८६.४०,श्रीतेज आकाश पोलकमवार-८५.४०,अजीम इब्राहिम सैय्यद-८५.४०,रतन भालचंद्र मालेकर-८३.०० ,मंथन संतोष मालेकर-८२.२०,ओम राजेश पोलशेट्टीवार-८१.८०,लकी किरण माहुलकर-७८.००,

ज्योतीकुमारी प्रदीपकुमार सिंग-७७.६०,विपुल विजय मालेकर-७५.६०,साकेत सैय्यद आरिफ-७२.००,तर हासिनी किशोर म्याकलवार-६१.०० या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेच्या सर्व संचालकांनी, शाळेच्या मुख्याध्यापकांनी व शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन आणि कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here