लग्नाचे आमिष दाखवून 17 वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण.

0
59

आरोपीवर गुन्हा दाखल.

सुरेश पाचभाई मारेगांव.

मारेगांव तालुक्यातील एका गावातील एका अल्पवयीन 17 वर्षीय मुलीला फुस लाऊन पळवून नेत मुलीवर वारंवार शारीरिक शोषण केल्याची घटना तालुक्यात एका गावात उघडकीस आली आहे.

सदर प्रकरणी अल्पवयीन पीडित मुलीच्या वडिलांनी मारेगाव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असुन सदर घटनेतील संशयित आरोपी महागाव ता.अहेरी जि.गडचिरोली येथुन ताब्यात घेण्यात आले असुन त्याचेवर पोक्सो सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा वडिलांनी मारेगाव पोलीस स्टेशनला दिनांक 21 फेब्रुवारी 2023 ला दिलेल्या तक्रारीनुसार 17 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 6 सुमारास त्यांचे घरी कुणी नसताना एका अज्ञात इसमाने त्यांचे 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा अज्ञानाचा फायदा घेत फुस लाऊन पळवून नेले होते.

या घटनेचा तपास मारेगांव पोलीस करत असताना चार महिन्यानंतर पोलिसांना आरोपी व पिडीत युवतीचे लोकेशन मिळाले.त्या मुळे मारेगांव पोलिसाचे पथक जमादार भालचंद्र मांडवकर, प्रमोद जीड्डेवार हे महागाव ता.अहेरी जि. गडचिरोली येथे दाखल झाले पीडित अल्पवयीन मुलीसह संशयित आरोपी संदीप लक्ष्मण आस्वले वय 27 वर्ष रा.हिवरी ता.मारेगाव असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव असून पीडित अल्पवयीन मुलीने मारेगाव पोलीस स्टेशनला दिलेला तक्रारीनुसार संशयित आरोपी हा लग्नाचे आमिष दाखवून पिडीतेच्या इच्छेविरुद्ध वारंवार तिचे लैंगिक शोषण करीत होता.

पिडीता ही गरोदर असल्याचे पीडित अल्पवयीन मुलीने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.पिडीतेच्या तक्रारीवरून मारेगांव पोलिसांनी गुन्हा नोंद करून घेत संशयित आरोपीविरुद्ध 366 (अ), 376, 376(1) (ए),376(2) (जे) (एन) 506 तसेच भा.द.वी.सहकलम 4, 6 (पोक्सो) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनात अजय वाभिटकर करत आहे.

Previous articleनिधन वार्ता..
Next articleनिधन वार्ता..
सुरेश पाचभाई
मुख्य संपादक Phone: 9922862184 SP न्यूज मारेगांव हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन न्युज पोर्टल असून या माध्यमाद्वारे परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या, सामाजिक व राजकीय, विश्लेषणात्मक बातम्या आणि महाराष्ट्र, देश, क्रीडा, कृषी, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित जनते पर्यंत पोहचविण्याचा एकमेव उद्देश आहे. " घडावा देश, हाची उद्देश , ....... आवाज जनतेचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here