महाराष्ट्र च्या नर्सिंग अध्यापिक पुष्पा पोडे (पाचभाई) यांना 2023 चा राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाईटिंगले अवॉर्ड प्रदान.

0
56

दिल्ली येथे मा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते प्रदान सोहळा संपन्न.

सर्व स्तरावरून कौतुकाचा वर्षाव.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयातील नर्सिंग अध्यापिका पुष्पा पोडे (पाचभाई) यांना राष्ट्रीय फ्लोरेन्स नायट्रिकल अवॉर्ड प्रदान करण्यात आला पुष्पा पोडे या मागील 2001 पासून नर्सिंग क्षेत्रात विविध योजना लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करतात आहे.पोडे यांनी 2001 मध्ये ग्रामीण रुग्णालय अहेरी इथून आपल्या कार्याची सेवा सुरू केली गडचिरोली जिल्ह्यासारख्या नक्षलग्रस्त भागात त्यांनी अवरित पाच वर्षे सेवा करत रुग्णांची सेवा केली.

चंद्रपूर जिल्हा ग्रामीण रुग्णालय येथे त्यांची बदली झाल्यानंतर बावीस वर्ष त्यांनी रुग्णसेवा केलेली असून कोरोना सारख्या आपत्ती काळात त्यांनी आपल्या अध्यापनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन करून कोरोनाशी लढण्यासाठी तयार केला आणि स्वतःही कोरोना सारख्या आपत्ती काळात त्यांनी स्वतःला अविरत झोकून देऊन रुग्णांची सेवा करून अनेकांचे प्राण वाचवले आहेत.

त्यांना अनेक जिल्यातील पुरस्काराने सुद्धा सम्मानीत केलं असून त्यांना नर्सिंग कौन्सिल ऑफ इंडिया यांनी पोडे यांची निवड राष्ट्रीय फ्लोरेन्स नायट्रिकल अवॉर्ड नर्सिंग क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कारासाठी करण्यात होती आज दि 22 जून रोजी मा राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्या हस्ते दिल्ली येथे राष्ट्रीय फ्लोरेन्स नायट्रिकल अवॉर्ड वितरित करण्यात आलाआहे.

पुष्पा पोडे या शेतकरी कुटुंबातील असून त्यां चंद्रपूर जिल्यातील कळमना या गावातील आहे त्या सध्या चंद्रपूर येथे कार्यरत असून अडेगाव येथील दत्तात्रय पाचभाई परिवार हे त्याचं सासर घर आहेत पोडे यांनी रुग्णसेवेसाठी अहोरात्र मेहनत घेऊन सेवा केली आहे.

त्यांनी या संपूर्ण यशाचे श्रेय त्यांनी त्यांचे वरिष्ठ त्यांचे सहकारी तसेच पोडे पाचभाई अडबाले,अडवे त्यांचा परिवार यांना दिलेला असून पुढेही त्यांनी अविरत कार्य कराचे निश्चय केला आहे.हा पुरस्कार पुष्पा पोडे पाचभाई यांनाच नाही तर महाराष्ट्राच्या जनतेला त्यांनी समर्पित केला आहे.

Previous articleनिधन वार्ता..
Next articleमारेगांव येथे आढळला अर्जुनी येथील युवकाचा मृतदेह.
सुरेश पाचभाई
मुख्य संपादक Phone: 9922862184 SP न्यूज मारेगांव हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन न्युज पोर्टल असून या माध्यमाद्वारे परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या, सामाजिक व राजकीय, विश्लेषणात्मक बातम्या आणि महाराष्ट्र, देश, क्रीडा, कृषी, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित जनते पर्यंत पोहचविण्याचा एकमेव उद्देश आहे. " घडावा देश, हाची उद्देश , ....... आवाज जनतेचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here