मारेगांवचे नवे ठाणेदारपदी पो.नि.जनार्दन खंडेराव यांची
नियुक्ती.

0
145

– आज पासुन त्यांचे कडे मारेगांव चे ठाणेदार पदाचे सूत्र.
– ठाणेदार राजेश अशोकराव पुरी यांची वणी येथे बदली .

विदर्भ एस पि न्युज नेटवर्क: मारेगांव,

मारेगावचे ठाणेदार राजेश अशोकराव पुरी यांची वणी येथे प्रशासकीय बदली करण्यात आली असून त्यांनी मारेगांव पोलीस स्टेशनला सुमारे दोन वर्ष ते कार्यरत होते.यवतमाळ शहरचे ठाणेदार जनार्दन एकनाथराव खंडेराव यांची मारेगाव पोलीस स्टेशनला बदली करण्यात आल्यामुळे खंडेराव हे आता मारेगावचे नवे ठाणेदार म्हणून काम पाहणार आहेत.

यवतमाळ जिल्हा पोलीस अस्थापना मंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार महाराष्ट्र पोलीस कायदा 1951मधील कलम 22(न )नुसार यवतमाळ जिल्हा पोलीस दलातील अधिकाऱ्याच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या करण्यात आल्या आहेत.

व बदली झालेल्या रिक्त जागेवर नव्या पोलीस अधिकाऱ्याच्या नेमणूका करण्यात आल्या आहे.नेमणूका झालेल्या अधिकाऱ्यांनी तात्काळ त्याच्या नेमणूका झालेल्या ठिकाणी हजर होऊन अहवाल जिल्हा पोलीस कार्यालय यवतमाळ येथे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

तसेच प्रलंबित असलेले गुन्हे,अकस्मात मृत्यू,तपास,अर्ज चौकशी,इत्यादी प्रकारणाची कागदपत्रे केस डायरीसह,संबंधित अधिकाऱ्यांकडे हस्तातरीत करण्याची दक्षता व खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.पवन बनसोड यांच्या स्वाक्षरीने देण्यात आल्या आहेत.प्रशासकीय कारणास्तव झालेल्या फेरबदलामुळे जनार्दन एकनाथराव खंडेराव हे आता मारेगावचे नवीन ठाणेदार म्हणून पुढील कामकाज पाहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here