मारेगांव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल.
विदर्भ एस पि न्युज नेटवर्क: मारेगांव,
मारेगाव तालुक्यातील कोसारा येथे दगडी खलबत्ता मारून पुतण्याने काकाची हत्या केल्याचा थरार तालुक्यातील कोसारा येथे घडला आहे.नात्याला काळिमा फसणारी घटना आज दिनांक 30 जून 2023 रोज शुक्रवारला सकाळी 9 वाजताच्या सुमारास घडली.मृत व्यक्तीचे नाव सुभाष संभाजी पचारे वय अंदाजे 49 असे असून या घटनेने कोसारा गावामध्ये हाहाकार माजला आहे.
तालुक्यातील कोसारा येथील पचारे कुटुंबातील सुभाष संभाजी पचारे व मोहन उर्फ चंपत देविदास पचारे हे घरी बसलेले होते. अशातच त्यांच्यामध्ये काही कारणावरून वाद झाला.यात रागाच्या भरात मोहन उर्फ चंपत देविदास पचारे याने नात्याने काका लागणाऱ्या सुभाष पचारे याच्या डोक्यात दगडी खल मारून जिवानिशी मारले ही घटना झाल्यानंतर लगेच मोहन उर्फ चंपत पचारे हा घरी निघून गेला.
सुभाष पचारे मरून पडून असल्याची घटना माहित होताच लोकांचा जमाव जमायला लागला.संशयीत आरोपी मोहन पचारे याला मृतकाच्या घरून बाहेर पडतांना काहींनी बघितले होते.यावरून संशयीत आरोपी मोहन पचारे याला एका साथीदारासह ताब्यात घेण्यात आले असून त्याचेवर कलम 302 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरक्षक ज्ञानेस्वर सांवत यांचे मार्गदर्शनात मारेगांव पोलीस करत आहे.