भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी.

0
125

मारेगाव ते वणी राज्य महामार्गावरील मांगरुळ बस स्टॉप जवळील घटना.

विदर्भ एस पि न्युज नेटवर्क: मारेगांव,

मारेगाव ते वणी राज्य महामार्गावर मांगरूळ बस स्टॉप जवळ भरधाव कारने दुचाकीस्वाराला मागुन जबर धडक दिली यात दुचकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.ही घटना आज दिनांक 20 जुलै 2023 रोज गुरूवारला दुपारी 12 वाजताचे सुमारास राज्यमहामार्गावर मांगरूळ बस स्टॉप जवळ घटना घडली.

प्रमोद नानाजी पाचभाई वय सुमारे 40 वर्ष रा.कुचना ता.वरोरा जि.चंद्रपूर असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या इसमाचे नाव असुन तो आज दुपारी 12 वाजताचे सुमारास कोलगाव येथून आपल्या पत्नीला माहेरी सोडुन परत कुचना येथे आपल्या गावाकडे जात असताना मांगरुळ बस स्टॉप जवळ यवतमाळ कडून वणी कडे जाणाऱ्या भरधाव कार नंबर MH.49 B.2416 ने हिरो होंडा फॅशन MH.34.6371 ह्या दुचाकीला मागुन जबर धडक दिली.

यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.रस्त्यांनी ये-जा करणाऱ्या काही नागरिकांनी घटनेची माहिती मारेगांव पोलिसांनी दिली व त्याला लगेच मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालत दाखल केले.तेथील डॉक्टरांनी प्रथम उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे स्थलांतरीत केल्याची माहिती आहे.घटनेची माहिती मिळताच मारेगांव पोलीस घटनस्थळी दाखल झाले.असून या प्रकरणाचा पुढील तपास मारेगांव पोलीस करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here