विनोदकुमार आदे यांना हेसन विद्यापीठाची डॉक्टरेट

0
76

तालुका प्रतिनिधी वणी,

वणीः येथील प्रतिभावंत कलावंत विनोदकुमार आदे यांना हेसन विद्यापीठाची डॉक्टरेट ही पदवी घोषित झाली आहे. आदे यांच्या सांस्कृतिक आणि कला क्षेत्रातील कार्याची दखल घेत त्यांना ही पदवी मिळणार आहे. हा पदवीदान सोहळा येत्या 1 जानेवारीला सिने अभिनेत्री महिमा चौधरी यांच्या उपस्थितीत जयपूरला होईल.

विनोदकुमार आदे हे हरहुन्नरी कलावंत आहेत. जवळपास शतक कलांचे मानकरी सोबतच ते वणी न्यूज एक्स्प्रेस या वृत्त वाहिनीचे संपादक तथा संचालक आहेत. एवढंच नव्हे तर विविधांगी लेखन, कविता, पटकथा, नाटक आदी साहित्यप्रकार ते लीलया हाताळतात.

बालपणापासूनच त्यांना कलाक्षेत्राची आवड आहे. विविध विषयांवरील संशोधन आणि नवनिर्मिती हा त्यांचा स्थायी भाव आहे. त्याचीच दखल घेत त्यांना डॉक्टरेट प्रदान करण्यात येणार आहे. आदे एक उत्कृष्ट रांगोळी कलावंत आणि चित्रकार आहेत. जिजाऊ जयंती, शिवजयंती, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, स्वातंत्र्य दिन , प्रजासत्ताक दिन व इतर राष्ट्रीय सणांना ते स्वयंस्पूर्तीने आणि निस्वार्थपणे वर्तमानातील घटकांवर प्रबोधनात्मक संदेश देणाऱ्या रांगोळी काढतात.

ते सृजनशील दिग्दर्शक तसेच अभिनेते आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक शॉर्टफिल्म्स तयार केल्यात. ज्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलं. ते सायंस मॉडेल्स बनविण्यातही एक्सपर्ट आहेत. या मॉडेल्सचं राज्यस्तरावरदेखील कौतुक झालं आहे.

त्यांच्या आतापर्यंतच्या सर्वच कलाकृती या श्रेष्ठ दर्जाच्याच अशा आहेत. ते सामाजिक भान जाणीपूर्वक राखतात. विविध सामाजिक संघटनांशी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यरीत्या ते जुळलेले आहेत. त्यांची स्वतःच्या सामाजिक संघटना आहे. श्री. गुरूदेव सत्संग सेवा समिती व न्यू गाईज युवा मंच
च्या माध्यमातून प्रबोधनात्मक कार्यक्रम, कला महोत्सव असे विविध उपक्रम त्यांनी राबविलेत.

त्यांच्या कार्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली. म्हणूनच त्यांना ही पदवी प्रदान होत आहे. शून्यातून संघर्ष करत यशाचं शिखर त्यांनी गाठलं. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here