उपसंपादक झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]
झरी जामणी पोलीस स्टेशन पाटण येथे तक्रारदार सुरेश आत्राम रा.टेम्भी यांनी त्यांच्या शेतातील कापूस रात्रीच्या वेळेस चोरून नेल्याबाबत पाटण पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यावरुन तपास सुरू होता.
या तपासात पाटण पोलीसांनी ता.२६ मंगळवारी झरी जामणी तालुक्यातील सुरेश कपलू टेकाम रा.मारोती पोड यास संशयित म्हणून अटक करून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देऊन साथीदार सुधाकर भीमराव आत्राम रा.मूळगव्हाण यांचेसह तक्रारदार याच्या शेतातुन दोन दिवस रात्रीचे वेळी कापूस चोरी केल्याबाबत कबुली दिली.
त्यावरून पोलिसांनी दुसऱ्या आरोपीसही अटक केली व आरोपींनी चोरी करून लपवून ठेवलेला शेतमाल कापूस आरोपींकडून जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार संदिप पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार सचिन गाडगे करत आहेत.

ही कार्यवाही पोलीस अधीक्षक पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी वणी गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पाटण पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदिप पाटील, पोलीस अंमलदार सचिन गाडगे, प्रदीप कवरासे, हेमंत कामतवार, संदिप सोयाम, नरेश गोडे, प्रशांत तलांडे यांनी केली.