जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांचे स्वाक्षरीने नियुक्ती पत्र बहाल
सुरेश पाचभाई मारेगाव,
मारेगाव:-भाजपाचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे यांच्या कार्यकाळ संपल्यामुळे मारेगाव तालुका भारतीय जनता पार्टीच्या तालुका अध्यक्षपदी अविनाश लांबट यांची निवड करण्यात आली.असून त्यांच्या निवडीने तालुक्यात भाजपला युवा नेतृत्व मिळालेले आहे.
अविनाश लांबट हे गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय चळवळीत सक्रीय आहे.त्यांनी काही दिवसांपूर्वी तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता.भाजप समर्थित पॅनलमधुन कृ.ऊ.बाजार समिती मारेगावच्या निवडणूक विजयी झाले.असून ते कृषि उत्पन्न बाजार समितीचे ते संचालक आहे व सिंदी महागाव येथील उपसरपंच आहे.

मनमिळाऊ स्वभाव असलेले अविनाश लांबट यांच्या बरोबर कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे.यवतमाळ जिल्हा भाजपा कार्यकारिणीने त्यांना तालुकाध्यक्ष पदाचा पदभार सोपविला आहे .
अविनाश लांबट यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय ओबीसी आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहीर,आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार,जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांना देत आहे व लांबट यांच्या निवडीने अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


