– करणवाडी बस स्टॉप जवळील घटना
गजानन देवाळकर सर मारेगांव,
मारेगाव येथील काम आटोपून आपल्या गावी परत जात असतांना करणवाडी फाट्याजवळील डिव्हायडरला दुचाकी धडकली. यात दुचाकीचालक गंभीर जखमी झाल्याची घटना आज दि. 28 डिसेंबरला सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास घडली. अपघातात जखमी झालेल्या युवकाचे नाव अनिल पोराते वय सुमारे 27 वर्षे असे असून तो वणी तालुक्यातील सुकनेगाव येथील राहिवासी आहे.

सविस्तर वृत्त असे की..
अनिल पोराते व एक साथीदार हे दोघे तरुण काही कामानिमित्त मारेगाव तालुक्यात आले होते. येथील काम आटोपूण ते आपल्या गावाला सुकनेगाव येथे परत जात असताना त्याच्या दुचाकीने करणवाडी बस स्टॉप जवळील डिव्हायडरला जबर धडक दिली.

या अपघातात अनिल हा गंभीर जखमी झाला तर दुसरा साथीदार हा किरकोळ जखमी झाला.अपघात होताच रस्त्यांनी ये-जा करणाऱ्या नागरिकांनी व स्थानिकांनी लगेच घटनेची माहिती मारेगाव पोलिसांना दिली. व त्यांना लगेच मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या प्रकरणाचा पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे.


