सुरेश पाचभाई मारेगाव,
मारेगाव तालुक्यातील कान्हाळगाव (वाई) येथील सुमारे 49 वर्षीय व्यक्तीने विषारी कीटक नाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना काल दिनांक 17 फेब्रुवारी 2024 रोज शनिवारला सकाळी 7:30 वाजताच्या सुमारास घटना उघडकीस आली.
सविस्तर वृत्त असे की.
तालुक्यातील एका पाठोपाठ एक आत्महत्यांचे सत्र सतत सुरु आहेत.ते थांबताना मात्र दिसून येत नाही.शासन स्तरावरून यावर कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाही अथवा या थांबण्यासाठी ठोस पावलेही उचलले जात नाही.
शत्रुघन तुकाराम मेश्राम वय सुमारे 49 वर्ष रा.कान्हाळगाव (वाई)असे कीटक नाशक प्राशन करून आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून मिळालेल्या माहिती नुसार शत्रुघन यांनी काल दिनांक 17 फेब्रुवारी 2024 रोज शनिवारला सकाळी 7:30 वाजताच्या सुमारास स्वतचे राहतेघरी कीटक नाशक प्राशन केल्याचे कुटुंबातील सदस्यांच्या लक्षात येताच त्याला लगेच करंजी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
पण त्यांची प्रकृती गंभीर असल्याने तेथील डॉक्टरांनी प्रथम उपचार करुन त्याला पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे स्थलंतरित केले पण यवतमाळ येथे उपचारादरम्यान दुपारी 3:30 वाजताच्या सुमारास त्यांची प्राज्योत मालवली असुन त्याच्या वडीलांच्या नावाने 5 एकर शेती असल्याची माहिती मिळाली आहे.असून शत्रुघन यांच्या पश्चात एक मुलगा,सुन असा आप्त परिवार आहे.त्यांच्या आत्महत्येचे कारण अजुन गुलदस्त्यात आहे.या प्रकरणाचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहेत.