निंबाळा येथे साकारणार रुद्राक्ष वन उद्यान

0
148

वनमंत्री सुधीर मुनघंटीवार यांच्या हस्ते भूमिपूजन

विदर्भ एस पी न्यूज नेटवर्क वणी,

वणी तालुक्यातील- निंबाळा येथील वन जमिनीवर रुद्राक्ष वन उद्यान साकारणार असून वनमंत्री सुधीर मुनघंटीवार यांच्या हस्ते दिनांक ७ मार्च २०२४ रोज गुरुवारला भूमिपूजन सोहळा आयोजित केला आहे.याप्रसंगी मंत्री लोकप्रतिनिधी प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

परिसरातील जनतेला या उद्यानाने पर्यावरण संतुलनाचा नवीन रम्य स्थळ प्राप्त होणार असून यात रुद्राक्ष पिंपळ,वळ,जांभूळ, बांबू,उंबर अशा विविध झाडांची लागवड केली जाणार असून हे उद्यान १५ हेक्टर परिसराचे राहणार आहेत. यवतमाळ वणी चंद्रपूर राज्य मार्गालगत निंबाळा या ठिकाणी याची निर्मिती होणार असून वणी,झरी, मारेगाव तालुक्याच्या जनतेला नवी ओळख देणारा हा प्रकल्प साकार करण्यात येत आहे.

वनसंपदेचे जतन करणे ही काळाची गरज असताना पर्यावरण संतुलन राखण्याकरीता मदत होणार असून वातावरणातील प्राणवायूचे प्रमाण वाढणार आहेत.वणी उपविभागातील निंबाळा येथे ता.७:ला वनमंत्री सुधीर मुनघंटीवार यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न होत असून याप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड प्रमुख उपस्थिती आमदार वजाहत मिर्झा,खासदार भावना गवळी, खासदार हेमंत पाटील तर विशेष अतिथी आमदार निलय नाईक, आमदार किरण सरनाईक, धीरज लिंगाडे ,आमदार अशोक उईके,आमदार मदन येरावार,

आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार,आमदार संदीप धुर्वे,आमदार नामदेव ससाने,आमदार इंद्रनील नाईक, वन विभागातील प्रधान सचिव  वेणूगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसरक्षक शैलेश टेंभुर्णीकर,प्रधान मुख्य वन संरक्षक महिप गुप्ता, वनसरक्षक वसंत घुले या मान्यवरांच्या हस्ते निंबाळा येथे ता.७ ला दुपारी दोन वाजता संपन्न  होत आहे. उपवनरक्षक किरण जगताप, सहाय्यक वनरक्षक शंकर हटकर, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रभाकर सोनडवले यांनी नियोजन केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here