आज आणि उद्याला भरणार यात्रा
सुरेश पाचभाई मारेगाव,
मारेगाव तालुक्यांतील पांडवदेवी (तिवसाळा) हे देवस्थान हे वणी यवतमाळ रोडवरील जळका स्टॉप वरुण दक्षिणेस 1 की. मी. अंतरावर आहे.

श्री क्षेत्र पांडवदेवी देवस्थान ट्रस्ट,तिवसाळा र.नं. ओ- 523 येथे महाशिवरात्रीनिमित्त आज भव्य यात्रा उत्सव दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दिनांक 8 मार्च 2024 रोज शुक्रवारला सकाळी 6 वाजता पासून या ठिकाणी सुरुवात झाली असुन मोठया प्रमाणात भाविकभक्ताची गर्दी आहे.

या ठिकाणी दर्शनाला व यात्रेला परिसरातील नागरिकांना सह बाहेर जिल्ह्यातील चंद्रपूर, नागपुर येथील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होतात ही यात्रा 2 दिवसांची असुन या ठिकाणी आज सकाळी 6 वाजता पासून परिसरातील भाविकांनी पांडवदेवी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली आहे सकाळी 9 वाजता पासून यात्रेला सुरुवात झाली आहे.

ही यात्रा उद्याला पण असणार अशी माहिती कमिटी कडून प्राप्त झाली आहे.पांडवदेवी (तिवसाळा) हे देवस्थान हेमाडपंती पुरातन मंदिर असून निसर्गाच्या सान्निध्यात आहे त्या मुळे नागरीक मोबाईल मध्ये येथील दृष कैद करताना व यात्रेचा आनंद घेताना दिसत आहे.



