झरी जामणी तालुक्यातील एकमेव शिव मंदिर
झमकोला येथील शिवगडावर हजारो भाविक भक्तानी घेतले शिवाचे दर्शन
उपसंपादक झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
दरवर्शी प्रमाणे या ही वर्षी शिवगड देवस्थान सामिती झमकोला यांनी भव्य महाशिवरात्री महोत्सव व प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित केला होता.काल महाशिवरात्री निमित पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी ‘ हरहर महादेव ‘ च्या गर्जना करत शिव गडावर गर्दी केली होती.बम बम भोले च्या गजरांनी शिवगड गर्जून गेला.भोलेनाथाच्या दर्शनासाठी सकाळ पासून भाविक भक्तांची रांग लागलेली पाहायला मिळाली.

दुपारी १२ वाजता प्रवचन हभप लक्ष्मणदास काळे महाराज मोझरी यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.आलेल्या भाविकांसाठी जागोजागी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली.तसेच गावात शाबुदाणा खिचडी च्या फराळाची व्यवस्था करण्यात आली होती.वस्तु खरेदी दुसऱ्या टेकडीवर फराळ ,खेळणी स्टेशनरी,आईस्क्रीम, जुस फाळाची इ. दुकाने थाटली होती.

अनेकांनी खरेदीचा आनंद घेतला.शिवगड समितीचे महादेव आत्राम,राजू उपरे,संतोष दुधहोहळे व गावकरी भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी सुंदर नियोजन केले.अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून आरोग्य विभागाकडून शिवगडावर रुग्णवाहिका उपलब्ध होती.



