मार्की ग्रा.प.अजब कारभार वार्ड १ चा रस्ता चिखलात,पायदळ चालने  कठीण

0
67

वार्डातील महिलांकडून रोष व्यक्त,सिमेंट रोड करण्याची मागणी

ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी,

मार्की ग्राम पंचायत वार्ड क्र.१ मध्ये जवळपास ४०० मीटरचा रस्ता संपूर्ण चिखलमय झाला असून दरवर्षी या वार्डातील रहिवाशांना हा त्रास सहन करावे लागत आहे परंतु अनेकदा तक्रारी करून ग्रामपंचायत कडून दखल घेतली जात नाही .
      
मार्की बु.वार्ड क्र.१ प्रविण विधाते यांचे घरापासून ते कवडू घूगुल  यांच्या घरापर्यंत जवळपास ४०० मीटरचा संपूर्ण रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.ह्या रोडच्या एका बाजूला गेल्या वर्षी भूमिगत नालीचे बांधकाम करण्यात आले होते.ही नाली बांधकाम करतांना ठेकेदाराने खोदकाम न करता जमीनीवर सिंमेंट पाईप ठेवून थातूरमातूर काम करण्यात आले तरी पण अर्धवट काम  करून  सचिवांशी संगमत  करून लाखो रुपये ग्रामपंचायत च्या खात्यातून गायब केले असा आरोप करत सचिवा विरोधात सरपंच इतर सदस्या कडून अनेक तक्रारीतुन करण्यात आला आहे.


त्यानंतर या भानगडीत हे काम वर्षभर बंद होते अर्धवटपणाचा लोकांना त्रास सहन करावा लागला. त्यानंतर या उन्हाळ्यात गावातील दुसऱ्या ठेकेदाराने हे काम पूर्ण केले आहे.परंतु नाली रस्त्यापेक्षा एक फूट उंच असल्याने  वार्डात  पावसाचे  पडणारे पाणी व  सांडपाणी नालीतून न जाता रस्त्यावर वाहत आहे.आता पावसाळा सुरू असल्याने अतिशय चिखल झाला असून रहिवाशांना आपल्या  घरापर्यंत ये जा करणे कठीण झाले. दुचाकी व इतर वाहन घरां पर्यंत नेता येत नाही.वयोवृद्ध व शाळकरी मुलांना यांचा अतिशय त्रास होत असून शेतकऱ्यांना रासायनिक खते व जीवनावश्यक वस्तू घरापर्यंत कसे न्यावे हा प्रश्न पडला आहे.


गेल्या अनेक वर्षापासून येथील रहिवासी हा त्रास सहन लागत असून येथील रहिवाशांना पावसाळा नकोसा होऊन जाते.चुकीच्या नाली बांधकामामुळे काही च्या  घरात ,अंगणात व गोठयात पाणी शिरले काही ठिकाणी पाणी साचत असल्याने असल्याने दुर्गंधी पसरली असून पावसाळ्यात डेंगू मलेरिया यासारखा आजार होण्याची शक्यता नाकरता येत नाही.

या कारभारामुळे विशेषतः महीलांकडून रोज व्यक्त करण्यात येत असून ग्रामपंचायत प्रशासनाने लवकरात लवकर उपयोजना करण्याची मागणी आशा पिंपळकर ,गिरजा माथनकर,मिनाक्षी जांबुळकर , मंगला देऊळकर,शालीनी मोहीतकर, किसनाबाई  जुनगरी , विमल बाई गोहोकार,चंद्रकला पिंपळकर, सिमाताई फटाले, वर्षा भट , सोनूताई गोहोकार , गीता मोहीतकर,शीला झट्टे , गिरीजा घुगुल  , अनिता विधाते  विजूबाई मोहितकर ,प्रमोद जांभुळकर ‘बालाजी पिंपळकर,बाबाराव पिंपळकर इत्यादी रहिवाशांनी केली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here