विषारी किटकनाशक प्राशन केल्याने,उपचारादरम्यान मृत्यू
ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी
बाळापूर (बोपापूर) येथिल शेतकरी त्यात्या वामन ढेंगळे (वय ५७ )यांनी शुक्रवार दि.१९ जुलै रोजी विषारी कीटकनाशक प्राशन केले असता उपचारासाठी वणी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु दि. २३ जूलै मंगळवार रोजी सायंकाळी ७ वा उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला .
बाळापूर येथील शेतकरी तात्या ढेंगळे याने १९ जुलै रोजी दुपारी दरम्यान आपल्या घरातच कीटकनाशक प्राशन केले होते.त्याच्या तोंडातून फेस निघत असल्याचे निदर्शनास येताच कुटुंबीयांनी तात्काळ वणी येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले.मागील ४ दिवसांपासून उपचार सुरु असताना २३ जुलै रोजी सायंकाळी सात वाजता दरम्यान त्याचा मृत्यू झाला. दिनांक २४ बुधवारला त्यांचे राहते गावी अंत्यसंस्कार करण्यात आले .
मृतक तात्या ढेंगळे यांचे कडे साडेचार एकर शेती असून यांच्यावर यवतमाळ मध्यवर्ती बँकेचे एक लाख रुपये तसेच इतर खाजगी सावकाराचे कर्ज असल्याचे जवळील नातेवाईकाकडून सांगण्यात आले आहे. सततची नापिकी तसेच उदरनिर्वाहाचा प्रश्न सतावत असल्यामुळे तात्या ढेंगळे यांनी आत्महत्या सारखा टोकाचा पाऊल उचलल्याचे बोलल्या जाते. मृतक याच्यामागे पत्नी, एक मुलगा व दोन विवाहित मुली असा आप्तपरिवार असून शासनाने त्याच्या कुटुंबीयांना मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.