इलेक्ट्रिक पोलवरून पडून 46 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

0
99

इलेक्ट्रिक पोलवरून पडून 46 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

नवरगाव (धरण) येथील घटना

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव तालुक्यातील नवरगाव (धरण) येथे आज दिनांक 25 जुलै 2024 रोज गुरुवारला सकाळी 9 वाजता इलेक्ट्रिक पोलवरून पडल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना सकाळी 9 वाजताचे दरम्यान उघडकीस आली.

सविस्तर वृत्त असे की…
गणेश नारायण नागपुरे वय 46 वर्ष रा.नवरगाव (धरण) असे मृतकाचे नाव असून तो नेहमी गावात प्रावेट इलेक्ट्रिकचे काम करायचा नेहमीप्रमाणे आज सकाळी तो नवरगाव येथील गावातील इलेक्ट्रिकचे पोलवर काम करत असताना अचानक पोलवरून पडून त्यांना जबर मार लागला गावातील काही नागरीकांनी व नातेवाईकानी त्यांना लगेच मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.त्याच्या मागे पत्नी,दोन मुले,असा आप्त परिवार आहे.या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांचे मार्गदर्शनात जमादार रजनीकांत पाटील करीत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here