बुरांडा ते मारेगाव राज्य महामार्ग 6 वर दीड-दीड फुटाचे खड्डे
– सबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज
– सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव तालुक्यातील राज्य महामार्ग 6 वर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून करणवाडी बस थांबा पासून तर बुरांडा बस स्थानकापर्यंत हायवेला मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून या मार्गाने मोठ्या प्रमाणात रहदारी असुन हा राज्य महामार्ग क्रमांक 6 असल्याने या रोडने ट्रक,कार, दुचाकीची मोठ्या प्रमाणात रहदारी असते.

गेल्या पाच दिवसापासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे हे पाण्यामुळे तुडुंब भरले असल्याने ते वाहन चालकाच्या निदर्शनास येत नसल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही .त्यामुळे या गंभीर विषयाकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. अशी परिसरातल्या नागरिकांमध्ये चर्चा आहे.


