सुरेश पाचभाई मारेगाव,
पावसाळी तालुका क्रीडास्पर्धेमध्ये हटवांजरी शाळेच्या 17 वर्षाखालील मुलींनी बाजी मारत जिल्हास्तरावर धडक मारलेली आहे.
मारेगाव तालुक्यात पावसाळी क्रिडा स्पर्धा पंचशील विद्यालय,नवरगाव येथे सुरू आहेत.कबड्डी स्पर्धेमध्ये 17 वर्षे वयोगटामध्ये मुलीच्या स्पर्धा मध्ये तालुक्यातील जीवनविकास माध्य.व उ.माध्य.विद्यालय हटवांजरी या विद्यालयाने अंतिम सामन्यात राष्ट्रीय विद्यालय मारेगाव वर कु.सिमरन कालेकर हिच्या नेत्रदीपक खेळीने विजय मिळवीत जिल्हा स्तरावर धडक मारली.

हटवांजरी शाळेच्या यशाबद्दल मारेगाव क्रीडा सयोंजक बंडू काकडे, जीवनविकास विद्यालय मुख्याध्यापक मुकेश महाडुळे,पंचशील विद्यालयाचे मुख्यापक चव्हाण सर यांनी विद्यार्थांचे अभिनंदन करून त्यांना जिल्हास्तर पात्र प्रमाणपत्र प्रदान केले.
संघाच्या विजयासाठी विद्यालयातील क्रिडा शिक्षिका मोघे मॅडम,गेडाम सर,मानकर सर,परेकार सर,जाधव सर,येन्नरवार सर,भोयर,खुनकर या सर्वांनी परिश्रम घेतले.विद्यालयाच्या या यशाबद्दल संस्था अध्यक्ष कुंदनकुमार महाजन व विद्यालयाचे मुख्याध्यापक मुकेश एम.महाडुळे यांनी विद्यार्थांचे व मार्गदर्शक कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
