घोडदरा येथील घटना
पाचभाई मारेगाव,सुरेश
काल झालेल्या मुसळधार पावसाने घोडदरा येथील दोन अल्पभूधारक शेतकऱ्यांची घरे कोसळून मोठे नुकसान झाले आहे.ही घटना दि.31 ऑगस्टला रात्री 10 च्या दरम्यान घडली.ऐन पावसाळ्यात झालेल्या या नुकसानीमुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळलेले आहे.
तालुक्यात मागील काही दिवसांपासून पाऊस सुरु आहे. सतत पावसाच्या रिपरिपने शेतकरी,शेतमजूर अडचणीत आलेले आहे. अशातच काल दि. 31 ऑगस्टला रात्रीच्या सुमारास जोरदार पावसाला सुरवात झाली.या मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागातील अनेकांच्या घरात पाणी शिरले.तर घोडदरा येथील दोन घर पडल्याने अल्पभूधारक शेतकऱ्यांचे अंदाजे लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
यात घोडदरा येथील विवेक शंकरराव नरवाडे व नत्थू वामन गाथाडे या दोन अल्पभूधारक शेतकऱ्यांची घरे अतिपावसाने जमीनदोस्त झाली आहे. यात नरवाडे यांचे सुमारे 85 हजार तर गाथाडे यांचे 25 हजार रुपयांचे नुकसान झाले असुन त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे.प्रशासनाने तात्काळ आर्थिक सहायता करावी अशी अल्पभूधारक शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.