सुरेश पाचभाई मारेगाव,
मारेगाव: शेतकऱ्यांच्या समस्या जाणून त्यांना पिकपरिस्थिती नुसार योग्य खरीपपूर्व योग्य मार्गदर्शन करण्याकरिता विकसीत कृषि संकल्प अभियानाची तालुक्यात उत्साहात सुरुवात झाली.
या अभियान अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र तथा केंद्रीय कापुस संशोधन केंद्र नागपूर येथील शास्त्रज्ञांनी तालुका कृषि अधिकारी मारेगाव समवेत मौजा वाघदरा, घोगुलदरा व बुरांडा येथे भेट देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

प्रसंगी कृषि विज्ञान केंद्र यवतमाळ चे शास्त्रज्ञ डॉ.प्रमोद मगर यांनी कापूस लागवड तंत्रज्ञान विषयीं शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. केंद्रीय कापुस संशोधन संस्था चे शास्त्रज्ञ डॉ.शिवाजी ठुबे यांनी सुरक्षित कीटकनाशकांचा वापर याविषयी शेतकऱ्यांसोबत चर्चा केली.

विभागीय कृषि संशोधन केंद्र यवतमाळ चे सहयोगी संचालक डॉ. लाटकर यांनी सोयाबीन लागवड तंत्रज्ञान व तणनाशके यांविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.तसेच तालुका कृषि अधिकारी दिपाली खवले यांनी फळबाग लागवड, रेशीम लागवड, सुरक्षित फवारणी इ. विषयी शेतकऱ्यांशी हितगुज केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता सर्व सहायक कृषि अधिकारी किशोर आत्राम, संगीता पेंदोर, सचिन आत्राम, निखिल पवार, प्रज्वल घोडेस्वार, रोहित जुमनाके यांनी परिश्रम घेतले.



