लग्नाच आमिष देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

0
2746

अल्पवयीन मुलगी गरोदर

आरोपी विरोधात मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सुरेश पाचभाई मारेगाव

एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमितष देऊन वारंवार अत्याचार केला.त्यामुळे अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याची घटना मारेगाव तालुक्यातील एका गावात घडली.

अत्याचार झालेली मुलगी ही अल्पवयीन असून ती 17 वर्षाची आहे.आरोपी हा केळापूर तालुक्यातील सोनुर्ली येथील आहे.आरोपीने अल्पवयीन मुलीला इच्छा नसतांना तीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केला. यातून अल्पवयीन मुलगी ही गर्भवती राहिली.

मुलीच्या भावाने मारेगाव पोलीस ठाणे गाठत आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली असून आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी आरोपी तरुणाविरोधात कलम 64 (2 ) (M)65(1) बी एन एस सहकलंम 3(a)4,5,(j)(ii)5(L)6 बा. लै. अ. प्र का. अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

सदर घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्की जाधव व मारेगाव पोलीस पोलीस करित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here