सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव तालुक्यातील नवरगाव मध्यम प्रकल्प (धरण) येथे नैसर्गिक आपत्ती 2025 च्या अनुषंगाने मॉक ड्रिल दिनांक 6 जून 2025 रोज शुक्रवारला करण्यात आली.ही मॉकड्रील नवरगाव येथील धरणावर करण्यात आली.
विकास मिना साहेब जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या आदेशानुसार आणि नितीशकुमार हिंगोले उपविभागीय अधिकारी वणी यांच्या मार्गदर्शनाखाली नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन २०२५ च्या अनुषंगाने नवरगांव,तालुका मारेगांव येथील प्रकल्पात ,वर्धा नदी पात्राचे लगत असलेल्या मारेगांव, वणी तालुक्यातील मौजा सावंगी, कोसारा, आपटी, शिवणी धोबे इत्यादी गावातील सरपंच, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल आधिकारी, महसूल सेवक, पोलीस पाटील, पट्टीचे पोहणारे व्यक्ती आणि पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचे उपस्थितीत माॅक ड्रील घेण्यात आली.

कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती उत्तम निलावाड तहसीलदार मारेगांव, भिमराव व्हनखंडे गटविकास अधिकारी प.स. मारेगांव, सुधाकर गावंडे पोलीस उपनिरीक्षक, सतीश मुन्न आपत्ती व्यवस्थापक प्रमुख, जिल्हा कार्यालय यवतमाळ आणि त्याचे चमु उपस्थित होते. उपस्थित चमुने तलावात बोट टाकून पाण्यात अडकलेल्या व्यक्तींना सुरक्षित स्थळी/ ठिकाणी हलवून त्याचा कसा बचाव करायचा या बाबत सविस्तर माहिती देऊन बोट चालविण्याचे प्रशिक्षण दिले. तहसीलदार यांनीही मोठ्या उत्साहाने प्रशिक्षण घेतले असल्याचे समजते
प्रतिक्रिया….
मारेगांव तालुक्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येत की, तालुक्यातील मागील दोन वर्षात आलेला अनुभव बघता पावसाळ्याच्या काळात नदी, नाल्यांना पुर येऊन, पुलावरुन, रस्त्यावरुन पाणी ओसंडून वाहत असताना काही वाहन धारक विचार न करता वाहने टाकतात. त्यामुळे वाहन वाहुन जाऊन जिवितहानी होण्याची शक्यता असते. असे न करता पाणी उतरेपर्यंत वाहन पुलावरुन/रस्त्यावरुन टाकू नये.व ये – जा करू नये असे आवाहन उत्तम निलावाड तहसीलदार मारेगांव, यांचे वतीने करण्यात आले आहे.


