अपघात होऊन मोडतात नागरिकांचे लचके
सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव: गेल्या उन्हाळ्यात उष्णतेची तीव्रता वाढली होती.तापमान 40-45 शी पार गेलेले होते. त्यामुळे रस्त्यावरील डांबर वितळले होते. तिथे आता गचके निर्माण झाले असून यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. याकडे बांधकाम विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
मे, जून महिना संपला असून जूलै महिन्याला सुरुवात झालेली आहे. पावसाळा सुरु असला तरी उष्णता मात्र कमी झालेली नाही. दिवसेंदिवस उष्णता वाढत असून तापमानाच्या पाऱ्याने रस्ते सुनसान केले होते. याच उष्णतेच्या तीव्रतेमुळे रस्त्यावरील डांबरसुद्धा वितळायला लागला होते. तालुक्यातील अनेक ठिकाणी असे दृश्य बघायला मिळत आहे.

तालुक्याचे महत्वाचे ठिकाण असलेल्या मारेगाव शहरात तर जागोजागी डांबर वितळत असल्याचे दिसत होते. शहराचा गाभा असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक जवळ असलेल्या स्पीड ब्रेकरवरील असलेले डांबर वितळलेले आहे.
याठिकाणी जर दुचाकी वेगाने आली आणि त्याला रस्त्याचा अंदाज नाही आला तर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक जण त्या ठिकाणी पडले असले तरी याकडे लक्ष द्यायला स्थानिक प्रशासन सुद्धा लक्ष द्यायला तयार नाही.त्यामुळे या बाबीकडे बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.


