मुकुटबन चुनखडी आणि डोलोमाइट खाणींना ५-स्टार रेटिंग पुरस्कार
ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी
झरी जामणी:आरसीसीपीएल प्रायव्हेट लिमिटेड (बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड) च्या मुकुटबन चुनखडी आणि डोलोमाइट खाणींना वैज्ञानिक आणि शाश्वत खाण पद्धतींमध्ये अनुकरणीय कामगिरीसाठी ५-स्टार रेटिंग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
राजस्थान कन्व्हेन्शन सेंटर जयपूर येथे भारतीय खाण ब्युरो (आयबीएम) चे नियंत्रक श्री पी.एन. शर्मा यांच्या सन्माननीय उपस्थितीत भारत सरकारचे कोळसा आणि खाण मंत्री माननीय श्री जी. किशन रेड्डी यांनी हा पुरस्कार प्रदान केला.

बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेडचे उत्पादन आणि प्रकल्प प्रमुख श्री रजत कुमार प्रुस्ती, मुकुटबन सिमेंट प्लांटचे युनिट प्रमुख श्री जयंत कांडपाल आणि मुकुटबन चुनखडी आणि डोलोमाइट खाणींचे उपाध्यक्ष (खाण) श्री कृष्णकुमार राठोड यांनी ही मान्यता स्वीकारली.
ही कामगिरी खाणकामांमध्ये पर्यावरणीय जबाबदारी, सुरक्षितता आणि नावीन्यपूर्णतेसाठी आमची अढळ वचनबद्धता दर्शवते. खाण क्षेत्रातील सर्वोच्च मानके कायम ठेवणाऱ्या टिम चं आणि भागधारकांच्या अथक प्रयत्नांना आम्ही हा सन्मान समर्पित करण्यात येत असाल्याचे कंपणी कडून सांगण्यात आले आहे .


