– गुरुपोर्णिमा मोहोत्सव,भव्य शोभायात्रा व महाप्रसाद
आयोजक साई मित्र परिवार, मारेगांव
सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगांव येथील साई मित्र परिवार तर्फे सतत गेल्या 15 वर्षापासून रक्तदान शिबीर सतत घेण्यात येत असुन अनेक गरजुवंत रुग्णांना त्यांनी जिवनदान दिले आहे, तेच कार्य अविरत सुरू असून यावर्षी सुद्धा भव्य रक्तदान शिबीर चे आयोजन करण्यात आले आहे.
जगन्नाथ महाराज मंदिर राष्ट्रीय विद्यालय मारेगांव येथे दिनांक 9 जुलै 2025 रोज बुधवारला सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबीचे आयोजन करण्यात आले असुन यासाठी वसंतराव नाईक शासकीय रक्त पेठी यवतमाळ यांचे सौजन्य लाभले आहे.

तसेच या ठिकाणी महाप्रसाद व भव्य शोभायात्राचे आयोजन दिनांक 10 जुलै 2025 रोज गुरुवारला दुपारी 3 ते 5 पर्यंत असुन शोभायातत्रेला सायंकाळी 5 वाजता पासून सुरुवात केली जाणार आहे याचे आयोजन साईमित्र परिवार मारेगांव यांनी केले आहे.


