सुरेश पाचभाई मारेगाव,
मारेगाव:- क्रांतीपर्व पुस्तक प्रकाशन सोहळा व राज्यस्तरीय कवी संमेलन नुकतेच हिंगणा रोड,वानाडोंगरी, नागपूर येथील मानवटकर भवनात संपन्न झाले. या कवी संमेलनात कु.प्रांजली रामदास तुराणकर या युवा कवयित्रीचा त्यांच्या ‘मानवा सांग’ या स्वलिखित कवितेसाठी सत्कार करण्यात आला.

प्रांजली हि मारेगाव तालुक्यातील बोटोणी येथील असून ती एका शेतकऱ्यांच्या कन्या आहेत. मान्यवरांनीही त्यांच्या लेखनकौशल्याचे कौतुक केले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी प्रभाकर तांडेकर होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. जावेद पाशा कुरेशी (वरोरा), तसेच विशेष अतिथी म्हणून हरिचंद्र धिवार, सुनीता तागवान, प्रा. रवींद्र गिमोनकर,उद्घाटक प्रा. डॉ. ईश्वर नंदापुरे आणि अन्य अनेक कवी, कवयित्री आणि युवा प्रतिभावंत उपस्थित होते.