भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरण व लसीकरणास सुरवात

0
710

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव:- शहरातील मोकाट कुत्र्यांच्या त्रासातून शहरवासियांची सुटका करण्यासाठी नगरपंचायत प्रशासन मागील बऱ्याच दिवसापासून प्रयत्नरत होते. कुत्र्याचे निर्बीजीकरण व लसीकरण करण्याकरिता वारंवार निविदा प्रक्रिया राबवण्यात आलेली होती, परंतु सदर कामासाठी योग्य कंत्राटदार मिळत नव्हता. मागील महिन्यात पुनःश्च एकवेळ निविदा प्रक्रिया पार पाडून ‘पीपल फॉर ॲनिमल’ या संस्थेस सदर काम देण्यात आलेले आहे.

सदर संस्थेने काल दिनांक 14 जुलै 2025 पासून कामास सुरुवात केली असून शहरातील मोकाट कुत्र्यांना पकडून त्यांचे वणी येथील लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय यांच्या जुन्या निवासस्थानातील खोल्यांमध्ये निर्बीजीकरण व लसीकरण प्रक्रिया करण्यात येत आहे.

शहरातील सर्व भटक्या व मोकाट कुत्र्यांना पकडून त्यांचे वैद्यकीयदृष्ट्या योग्य पद्धतीने निर्बीजीकरण व लसीकरण करण्यात येणार आहे. यामुळे शहरातील भटक्या कुत्र्यांच्या त्रासातून नागरिकांची सुटका होईल या आशेने नागरिक आश्वस्त झाले आहेत.

‘पाळीव कुत्र्याची नगरपंचायतला नोंद करा’

शहरातील भटक्या कुत्र्यांचा त्रास कमी करण्यासाठी नगरपंचायत मार्फत निर्बीजीकरण व लसीकरण या कामासाठी निविदाप्रक्रिया पार पाडून संस्थेची निवड करण्यात आलेली आहे. संस्थेमार्फत शहरातील रस्त्यावरील कुत्रे पकडण्याचे काम सुरु झालेले आहे. भटक्या व मोकाट कुत्र्यांना पकडताना पाळीव कुत्रे पकडले जाणार नाहीत, याची खबरदारी घेण्याबाबत संबंधित संस्थेस सांगण्यात आले आहेच, मात्र या कामानिमित्ताने ज्या नागरिकांकडे पाळीव कुत्रे असतील त्यांनी आपल्या पाळीव कुत्र्याचे लसीकरण करून नगरपंचायतच्या आरोग्य विभागात नोंद करावी, असे मी आवाहन करतो.

शशिकांत मा. बाबर (मशप्रसे)
मुख्याधिकारी, न पं मारेगाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here