बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज
ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी
तालुक्यातील अडेगाव ते खातेरा या मार्गाची अतिशय पावसाने दयनीय अवस्था झाल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे.कारणही तसेच आहे सध्या या मार्गाने वर्दळ देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आज पर्यंत चंद्रपूर जिल्हा सीमेलगत पुल नव्हता आता खातेरा गावाजवळ पैनगंगा नदी पात्रात मोठा पूल झाला आहे.
आणि त्या मार्गाने चंद्रपूर,आंध्रप्रदेश व तिकडे अनेक जिल्ह्यात प्रवेश करता येतो. दिवसेंदिवस या अडेगाव ते खातेरा मार्गाने शेकडो वाहन धारक ये – जा करतात. मार्ग खड्डेमय बनल्याने वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.या मार्गाने खातेरा गावातील शाळकरी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात ऑटो ने व बस ने मुकुटबण येथे शिक्षणासाठी जातात.मात्र सध्या पावसाळा सुरू झाला आहे.रस्त्याने मोठ मोठाले दोन दोन फुटाचे खड्डे पडले आहे.

यात भविष्यात ऑटो पलटी झाला तर कित्तेक विद्यार्थ्यांना जीव सुद्धा गमवावा लागतो.या रोड ची समाप्ती 31/3/2026 असून म्हणजे सहा वर्षे मुदत असून सुद्धा चार वर्षे मधे कसा का रोड खराब होतो हा देखील प्रश्न या निमित्याने उपस्थित होताना दिसत आहे.समंधित ठेकेदाराने या कडे जाणीव पूर्व लक्ष देऊन हा रोड बरोबर करून डागदुगी करून द्यावी तात्काळ काम न झाल्यास आंदोलन देखील करण्यात येईल असे देखील गावकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.


