सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव तालुक्यातील जळका महसूल मंडळा अंतर्गत असलेल्या चि. बोटोनी येथे आज दि. 28 जुलै 2025 रोज सोमवारला महाराष्ट्र शासन महसूल विभागाच्या वतीने “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ” ह्या कार्यक्रमाअंतर्गत महाराजस्व समाधान शिबिर घेण्यात आले.
ह्या शिबिराला उदघाटक म्हणून चि बोटोणी येथील प्रथम नागरिक तथा सरपंच मा.श्री.प्रवीण वनकर तर अध्यक्ष म्हणून मा.उत्तम निलावाड तहसिलदार मारेगाव हे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून विचारपीठावर मा.महेश रामगुंडे नायब तहसिलदार महसूल, श्री .तुळशीराम कुमरे सरपंच सराटी, श्री.विजय मोघे पोलीस पाटील चि. बोटोनी,
डॉ देवाळकर मॅडम,भेले सर मुख्यध्यापक, इंगळे साहेब, हे उपस्थित होते. प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा गांधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन व हारार्पण करून तसेच दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

ह्या कार्यक्रमाची प्रास्ताविकपर भूमिका मा. श्री महेश रामगुंडे साहेब यांनी मांडून ह्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विषद केला.तर श्री.तुळशीराम कुमरे सरपंच यांनी शासनाच्या विविध विभागाच्या कामाची व ह्या कार्यक्रमाची प्रशंसा केली.नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दाखविला त्याबद्दल समाधान व्यक्त करून जास्तीत जास्त नागरिकांनी विविध विभागांच्या विविध योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
तर विचारपीठावर उपस्थित मा.प्रविण वनकर सरपंच चि. बोटोनी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले तसेच मा.तहसिलदार मारेगाव उत्तम निलावाड यांनीही ह्या कार्यक्रमात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करून उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.रघुनाथ कांडरकर मंडळ अधिकारी जळका तर आभार मा.प्रविण उपाध्याय यांनी मानले.
बोटोणी येथे सकाळपासूनच नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रचंड उपस्थिती दर्शविली. मान्यवरांच्या हस्ते जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, डोमीसाईल, नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र, दुय्यम शिधापत्रिका तसेच जॉब कार्ड. जन्म मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र, यांचे वितरण करण्यात आले.

ह्या कार्यक्रमात महसूल विभागाच्या ( जात प्रमाणपत्र नॉन क्रिमिलयेर, उत्पन्न दाखले, आधार अपडेशन, निराधार योजनेच्या केसेस राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, दुय्यम शिधा पत्रिका, नवीन मतदार नोंदणी) असे एकूण 576 तर कृषी विभाग 108, पशुसंवर्धन विभाग 112, आरोग्य विभागाच्या 738 तपासण्या ह्या शिबिरात करण्यात आल्या.
तसेच पंचायत विभाग 20, वनविभाग 8 एवढ्या सेवा/प्रमाण पत्राचा लाभ शिबिरात देण्यात आला. मोठ्या प्रमाणात दाखले, प्रमाणपत्र वितरण, विविध सेवांचा लाभ, सोयी सुविधांचा लाभ व विविध योजनांबाबत माहिती नागरिकांना ह्या समाधान शिबिरात मिळाली. त्यामुळे नागरिकांचे चेहऱ्यावर समाधान दिसून आले .शासनाच्या ह्या स्तुत्य उपक्रमाची नागरिकांनी प्रशंसा केली.
ह्या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी चि.बोटोनी गावाचे ग्राम महसूल अधिकारी प्रफुल्ल सोयाम, जयवंत कनाके तसेच जळका मंडळातील ग्राम महसूल अधिकारी भीमराव धोटे, अतुल किनाके, मनोज गेडाम, पल्लवी उरवते, प्रथमेश गुल्हाने, तसेच ग्राम महसूल सेवक रोशनी वरखडे, प्रभाकर आत्राम, अमिना मडावी, रमेश सुरपाम, सुरेश नैताम, ग्रा.प .कर्मचारी जानुभाऊ दोडेवार, शरद डाहुले यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अथक परिश्रम घेतले .


