तहसील कार्यालय येथे महसूल दिन साजरा

0
262

महसूल सप्ताहाला आज पासुन सुरुवात

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव येथील तहसील कार्यालयात आज दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोज शुक्रवारला दुपारी 3 वाजता महसूल दिन साजरा करण्यात आला. दिनांक 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट पर्यंत महसूल सप्ताहाला सुरुवात  करण्यात आली.

सदर कार्यक्रमात वयाचे 60 वर्षे पूर्ण होऊन सेवानिवृत्त झालेच्या सत्कार करण्यात आला.श्रीमती लता मेश्राम,शंकर गेडाम यांना निरोप समारंभ देण्यात आला,आणि बदली होऊन रुजू झालेले विजय भत्ते नायब तहसीलदार आणि अमर पळवेकर महसूल सहाय्यक यांचे स्वागत करण्यात आले.

महाराष्ट्र शासनाने दिनांक 1 ऑगस्ट ते 7 आगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह साजरा करावयाचा आहे त्याबाबत दिनांक निहाय सविस्तर मार्गदर्शन करुन लोकांना सेवा सप्ताह कालावधीत ज्या सर्व सामान्य नागरिकांना सेवा उपलब्ध करून द्यावयाच्या आहेत त्याचे सविस्तर मार्गदर्शन केले.

हा महसूल दिन साजरा करण्यासाठी मारेगाव तहसीलचे तहसीलदार उत्तम निलावाड, श्रीकांत बाबर मुख्याधिकारी नगरपंचायत मारेगाव, पोलीस उपनिरीक्षक विक्की जाधव, सर्व मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक आणि तहसील कार्यालयातील कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here