तालुका प्रतिनिधी वणी
वणी ते कायर या मार्गावरील सैदाबाद फाट्याजवळ एक ट्रक पलटी झाल्याची घटना आज दिनांक 2 ऑगस्ट 2025 रोज शनिवारला सकाळी 9:30 वाजताच्या सुमारास घडली असून वाहतूक मोठी कोंडी झाली.या वेळी वाहणांच्या रांगाचरांगा वाढल्याचे चित्र पहावयास मिळले.

वणी तालुक्यातील नवरगाव जवळील सैदाबाद फाट्या जवळ एक सिमेंटचा ट्रक क्रमांक RJ 57 GA 0195 हा भर रस्त्यात पलटी झाला यामुळे मुकुटबन कडून वणीकडे व वणी कडून कायर कडे जाणारी सर्व वाहतुक कोलमडली आहे.

हा अपघात कशाने झाला याबाबत अद्याप स्पष्टता समोर आली नाही पण ट्रक रोडवर पलटी झाल्यामुळे वाहतूक ठप्प झाली.अपघात स्थळावर बघ्यांची मोठी गर्दी झाली.यामुळे सुमारे एक दोन तासाहून अधिक काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली झाली असून
सुदैवाने या अपघातात कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही, या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.


