सुरक्षित फवारणीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

0
481

तालुका कृषी विभागाचे आयोजन

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्या वतीने व प्रभारी तालुका कृषी अधिकारी सुरेश बुटले यांच्या मार्गदर्शनाखाली वेगाव येथे शेतकऱ्यांना कीडनाशकांची सुरक्षित फवारणी करण्याबाबत जागरूकतेसाठी विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमात शेतकऱ्यांना योग्य फवारणी तंत्रज्ञान,बचावात्मक उपाययोजना, व व्यक्तिगत सुरक्षा साधनांच्या (PPE kit) वापराबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.या वेळी सहायक कृषी अधिकारी निखिल पवार यांनी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष उदाहरणांद्वारे फवारणी करताना घ्यावयाची काळजी, योग्य वेळ, हवामानाचा विचार, तसेच फवारणीदरम्यान वापरण्यात येणारे सुरक्षित साहित्य याबद्दल मार्गदर्शन केले.

उपस्थित शेतकऱ्यांना सुरक्षित फवारणीसाठी आवश्यक असलेल्या फवारणी किटचे मोफत वाटप देखील करण्यात आले. या किटमध्ये मास्क, हातमोजे, चष्मे व एप्रन यांचा समावेश होता.कार्यक्रमास अनेक शेतकरी उपस्थित होते.त्यांनी या उपक्रमांचे स्वागत केले आणि या माहितीचा आम्हाला शेतीमध्ये नक्कीच उपयोग होईल असे मत व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here