सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव तालुक्यातील कोसारा येथे दिनांक ४ ॲागष्ट २०२५ रोज सोमवारला महसूल सप्ताह अंतर्गत समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सदर शिबीरास अध्यक्ष उपसरपंच सचिन पचारे होते. व्यासपीठावर माजी सरपंच पांडुरंगजी नन्नावरे,पोलीस पाटील गाणार, कोसारा, पोलीस पाटील बोबडे सावंगी तथा कोसारा बिएलओ उपस्थित होते.
सदर शिबिरात उत्पन्न प्रमाणपत्र,कास्ट सर्टिफिकेट,दुय्यम शिधापत्रिका चे वितरण करण्यात आले. सदर सभेस कोसारा ग्राम महसूल अधिकारी प्रविण उपाध्याय यांनी संचालन व मार्गदर्शन केले. सदर शिबिरात ई पिक पाहणी ,ॲग्रीस्टॅक नोंदनीचे महत्व विषद करून नोंदणी करण्यास पि. आर. उपाध्याय यांनी सांगितले. तसेच पांडुरंगजी नन्नावरे यांनी शिधापत्रिका व ईतर विषयावर मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय भाषणात सचिन पचारे यांनी केले. मागील २५ वर्षात कोसारा येथे असे शिबीर झाले नाही.या शिबिराची त्यांनी प्रशंसा करुन गावातील नागरीकास गावातच कागदपत्रे मिळाल्याने समाधान व्यक्त केले. शिबीरास ग्रा. म. अ. कुंभा कमलेश सुरावार , दाऊ मॅडम ग्रा. वि. अ. बोरी ग. यांनी मोलाचे मार्गदर्शन केले व विक्रम मडावी ग्रा. म. अ. यांनी आभार प्रदर्शन केले. सदर शिबिरास कोसारा, सावंगी येथील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


