मारेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न

0
363

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आज दिनांक 4 ऑगस्ट 2025 रोज सोमवारला श्री.छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सदर समाधान शिबिराला वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री.संजयभाऊ देरकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

वणी उपविभागाचे उपविभागीय अधिकारी आदरणीय श्री.नितीनकुमार हिंगोले,मारेगाव तहसीलचे तहसीलदार श्री. उत्तमराव निलावाड प्रामुख्याने उपस्थित होते. सदर समाधान शिबिरामध्ये मारेगाव तहसीलचे नायब तहसीलदार श्री.महेश रामगुंडे यांनी प्रास्ताविक भाषणाने सुरवात केली.

शिबिरात महसूल विभाग, वन विभाग, कृषी विभाग, पंचायत विभाग, पुरवठा विभाग,आरोग्य विभाग यांचे मार्फत एकूण 889 दाखल्यांचे नागरिकांना मान्यवराच्या हस्ते वितरित करण्यात आले. सदर शिबीर यशस्वी करण्याकरिता मारेगाव मंडळातील ग्राम महसूल अधिकारी श्री. राजू डवरे, श्री.मनोज चिकनकर,

श्री.विक्की केवट, श्री.शिंगणे, श्री.रत्नदिप वाघमारे, श्री.भीमराव धोटे, श्री.जिवन आत्राम यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच मारेगाव मंडळातील महसूल सेवक यांनी शिबीर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी खूप परिश्रम घेतले.सदर शिबिरात नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद व उत्साह दिसून आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here