सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मार्च २०२४-२५ या शैक्षणिक सत्रात उत्तीर्ण झालेल्या तसेच विशेष कार्य करणाऱ्या लोकसेवक व पदाधिकारी यांचा जाहीर सत्कार दिनांक ३१ जुलै २०२५ रोज गुरुवारला दुपारी १२ ते ५ या वेळेत शेतकरी सुविधा केंद्र येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणगौरव समिती द्वारा आयोजित गुणगौरव सोहळा २०२५ मध्ये थाटात संपन्न झाला.
या सोहळ्याचे उद्घाटन अध्यक्ष वर्धमान फाउंडेशन वणी व संचालक बुलढाणा अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी विजयबाबु चोरडिया व मंचावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेची पूजा व पुष्प अर्पण करून करण्यात आले.
तर या सोहळ्याचे अध्यक्षस्थान अखिल भारतीय सरपंच संघटना अध्यक्ष मारेगाव तालुका अविनाश लांबट यांनी भूषविले असून प्रमुख मार्गदर्शक म्हणून पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर, मुख्याधिकारी शशिकांत बाबर,शाखा व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक तुषार क्षीरसागर,

उपकार्यकारी अभियंता विद्युत महावितरण श्यामसुंदर कुर्रा,कृषी अधिकारी पंचायत समिती संदीप वाघमारे, वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर हटकर व सहाय्यक गटविकास अधिकारी हेमराज राठोड हे लाभले असून सर्वांनी विचारमंचावरून उपस्थित श्रोत्यांना मोलाचे मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या
तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सराटी तुळशीराम कुमरे, अध्यक्ष जय शिवाजी दुर्गा उत्सव मंडळ मारेगाव विशाल किन्हेकर व सदस्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन मंडळ घोडदरा दयाल रोगे हे लाभले असून विचार मंचावर उपस्थित उद्घाटक, अध्यक्ष, प्रमुख मार्गदर्शक व प्रमुख पाहुण्यांनी सोहळ्याला शुभेच्छा दिल्या
असून या सोहळ्यात विद्यार्थ्यांचे व विशेष कार्य करणारे लोकसेवक व पदाधिकारी म्हणून सरपंच सावंगी ग्रामपंचायत अभिजीत मांडेकर, जिल्हा परिषद शिक्षिका कामिनी दोडके (दांडेकर), ग्राम विकास अधिकारी रेवीचंद जनबंधू, तलाठी संजय शिंदे, पोलीस पाटील अर्चना सयाम, वनरक्षक प्रफुल्ल मलमकर ,समाजसेवक विमल फुलझेले,पत्रकार पंकज नेहारे, रास्त भाव दुकानदार पांडूरंग कोहळे,रोजगार सेवक खुशाल येरगुडे व उद्योजक धम्मपाल दारुंडे चोखाजी गॅस एजन्सी यांना सन्मानचिन्ह देवून सन्मानीत करण्यात आले.
या सोहळ्याचे सूत्रसंचालन पत्रकार दै.नमो महाराष्ट्र माणिक कांबळे यांनी तर प्रास्ताविक उपसरपंच वनोजा (देवि) व सामाजिक कार्यकर्ता प्रशांत भंडारी तसेच आभार आयोजक पत्रकार सांध्य दै.यवतमाळ मार्मिक प्रतिभा तातेड यांनी मानले असून कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता सामाजिक कार्यकर्ता आदेश तातेड यांचे योगदान लाभले असून या सोहळ्याची सर्वत्र सकारात्मक चर्चा सुरु आहे.


