जिल्हा क्रीडा अधिकारी यवतमाळ यांचे तर्फे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मारेगाव येथे दोन दिवसीय स्पर्धेचे आयोजन
सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव – तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो येथे आज दिनांक 5 ऑगस्ट 2025 रोज मंगळवार ला सकाळी 10 वाजता जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र पाटील ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव सन्माननीय महेंद्र कुमार बोथरा तसेच संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय दिगंबर पाटील मस्की त्याचप्रमाणे वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अविनाश घरडे व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते.

तसेच जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा ही दि. 5 आणि 6 ऑगस्टला कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे द्वारा सदर दोन दिवसीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

आज दि. 5 ऑगस्ट रोजी मंगळवारला जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये मुलींची स्पर्धा घेण्यात आली. तर उद्या दिनांक 6 ऑगस्ट रोज मुलाची बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात येणार आहे. यामध्ये मुलींची वय मर्यादा 14,17, 19 वर्ष आणि मुलांची वयो. मर्यादा 14,17, 19 अशी ठेवण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी मुलींची आजची संख्या 131 इतकी होती.

जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरातून विजेता असलेले सर्व खेळाडू या स्पर्धेत सहभागी झालेले आहेत या स्पर्धेत यशस्वी करण्याकरिता तालुका क्रीडा संयोजक बंडू काकडे सर, बेलेकर सर, ठावरी सर , सूर्यवंशी सर, पुंडे सर, तसेच मालेगाव तालुक्यातील सर्व शाळेचे मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षकांचे सहकार्य लाभले.


