पत्रकार संरक्षण समितीची नवी कार्यकारिणी घोषित
प्रमोद रा.मेश्राम मारेगाव
मारेगाव तालुका पत्रकार संरक्षण समितीची नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली.यात भैयाजी अंबादास कनाके यांची अध्यक्ष म्हणून तर सुरेश निळकंठ पाचभाई यांची सचिव म्हणून निवड करण्यात आली. ही निवड सर्वानुमते करण्यात आली.
मारेगाव तालुका पत्रकार संरक्षण समितीचे कार्यरत अध्यक्ष यांचा कार्यकाल संपलेला होता.त्यामुळे नवीन अध्यक्ष निवडी करीता दि.10 ऑगस्टला मारेगाव येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये भैय्याजी अंबादास कनाके यांची सर्वानुमते अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

तर सचिव म्हणून सुरेश निळकंठ पाचभाई यांची निवड करण्यात आली. इतर प्रतिनिधीमध्ये उपाध्यक्ष सुमित गेडाम, सहसचिव शरद खापणे, कोषाध्यक्ष धनराज खंडरे,संघटक गजानन आसूटकर, प्रसिद्धी प्रमुख प्रफुल ठाकरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी संघटनेचे ज्येष्ठ मोरेश्वर ठाकरे, सुरेश नाखले, सुमित हेपट,भास्कर राऊत उपस्थित होते.
योग्य ध्येयधोरणे राबवून सर्वसामान्य जनतेसाठी लढा देणार –
भैय्याजी कनाके माझी अध्यक्ष म्हणून करण्यात आलेली निवड ही मी सार्थ ठरविणार.सर्वसामान्य जनता, शेतमजूर, शेतकरी तसेच पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी लेखणी आणि संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करील असे आश्वासन दिले.


