राज्य महामार्गावरील डिव्हायडर देत आहे अपघाताला निमंत्रण
सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव तालुक्यातील गौराळा फाट्यापासुन जवळच राज्य महामार्गावर ट्रक विसावा स्थळ आहे.या ठिकाणी हायमास्ट लाईट लावण्यात आला आहे.पण तो गेल्या काही महिण्यापासून बंद आहे. त्यामुळे हा हायमास्टलाईट शोभेची वस्तू बनलेली आहे.रात्रीच्या वेळीस त्या ठिकाणी रोडच्या कडेला असलेले डिव्हायडर दिसत नसल्यामुळे एखादा मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे.
सदर हायमास्ट लाईट बंद असल्याने रात्रीच्या वेळी राज्य महामार्गाने ये – जा करणाऱ्या वाहनधारकाच्या डिव्हायडर निदर्शनास येत नसल्यामुळे त्या ठिकाणी अनेक छोटे अपघात झाले आहे. पण सबंधित विभाग निद्रावास्थेत असल्याचे रस्त्यांनी ये-जा करणाऱ्या नागरिकांत चर्चा आहे गौराळा, नेत, वरुड, आकापुर लाखापूर व त्या परिसरातील नागरिकांना मारेगाव येथे तालुक्याचे ठिकाणी येण्यास हा मुख्य मार्ग आहे.
या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. गेल्या महिन्यात या ठिकाणी अनेक अपघात झाल्याचे वास्तव आहे.व काहीना जीवही गमवावा लागला तर काहींना कायम अपंगत्व आले आहे.त्या मुळे हायमास्ट लाईट लवकरात लवकर दूरस्त करून देण्यात यावे अशी परीसरातील नागरिकांची मागणी आहे.


