आ. संजय देरकर यांच्या हस्ते लोकार्पण; पाच गावांना मिळणार आरोग्यसेवेचा लाभ
सुरेश पाचभाई, मारेगाव
मारेगाव तालुक्यातील बुरांडा (ख.) येथे नव्याने उभारलेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे उद्घाटन स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आज दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोज शुक्रवारला दुपारी ३ वाजता वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर यांच्या हस्ते करण्यात आले.

हे उपकेंद्र बुरांडा, खडकी, खापरी, घोडदरा आणि म्हैसदोडका या पाच गावांसाठी कार्यान्वित होणार असून, स्थानिक नागरिकांना यामुळे वेळेवर आणि सुलभ वैद्यकीय सुविधा मिळणार आहेत.

उद्घाटन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून डॉ. रानानुर सिध्दीकी (सामाजिक कार्यकर्त्या) उपस्थित होत्या,प्रमुख पाहुण्यांमध्ये माजी जि.प. सदस्य अनिल देरकर, सौ.किरणताई देरकर अध्यक्ष एकविरा बँक मारेगाव,सरपंच सौ. रंगुबाई दा.आत्राम, उत्तमराव निलावाड, तहसिलदार मारेगाव, गटविकास अधिकारी भिमराव व्हनखंडे, पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना वा. देठे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास कांबळे, पं.स. विस्तार अधिकारी माने साहेब, कृषी विस्तार अधिकारी संदीप वाघमारे आदी मान्यवरांचा समावेश होता.

यावेळी ग्रामसेवक हुसेन टेकाम, ग्रामपंचायत सदस्यगण, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. रोशन दा. मानकर, आरोग्य सेविका कु. रोहिणी खामनकर, आरोग्य सेवक निलेश दादाजी आत्राम,आशा वर्कर्स,आरोग्य मदतनीस, माजी पोलिस पाटील बबन जोगी, मधुकर वरटकर तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन दिगंबर दैने शिक्षक जिल्हा परिषद शाळा बुरांडा यांनी केले तर आभार प्रदर्शन निकेश डोहने यांनी केले.

या नव्या उपकेंद्रामुळे परिसरातील आरोग्यसेवेचा दर्जा उंचावून रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यास मोठी मदत होणार असल्याचे यावेळी बोलताना आमदार संजय देरकर यांनी सांगितले.


