सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव : तालुक्यातील बोटोनीजवळ आज दिनांक १६ ऑगस्ट २०२५ रोज शनिवारला पहाटे ५ वाजताच्या सुमारास एका ट्रकला अचानक आग लागल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
ट्रक जळाल्याने रस्त्यावर दाट धुराचे लोट पसरले होते. त्यामुळे काही वेळेसाठी मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. सदर ट्रक मध्ये सोयाबीन भरलेली होती.हा ट्रक करंजी कडून वणी कडे जात होता.या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली व आग विझवण्याचे काम सुरू केले. स्थानिक नागरिक देखील घटनास्थळी मोठ्या संख्येने जमले होते.
सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग नियंत्रणात आल्यानंतर मारेगाव व करंजी पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू केले असून प्रवाशांना थोड्या वेळासाठी गैरसोयीचा सामना करावा लागला.


