शुभेच्छुक : अविनाश लांबट मित्र परिवार, मारेगाव
सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव :भारतीय जनता पार्टी मारेगाव तालुक्याचे अध्यक्ष अविनाश भाऊ लांबट यांचा वाढदिवस आज उत्साहात साजरा करण्यात येत आहे. कार्यक्षम नेतृत्व, सामाजिक बांधिलकी आणि कार्यकर्त्यांशी असलेला आपुलकीचा स्वभाव यामुळे अविनाशभाऊ यांनी मारेगाव तालुक्यातील राजकारणात भक्कम स्थान निर्माण केले आहे.
अविनाश भाऊ लांबट हे सदैव कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना मार्गदर्शन करतात. शैक्षणिक, सामाजिक व सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर ते सातत्याने काम करत आहेत. त्यांची विकासाभिमुख भूमिका आणि जनसंपर्कातील आपुलकीमुळे त्यांना “भाऊ” म्हणून विशेष मान मिळतो.

आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी, ग्रामस्थ, सामाजिक संस्था आणि मित्रपरिवाराकडून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
“भाऊंच्या नेतृत्वाखाली मारेगाव तालुका अधिक प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करेल,” असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला आहे.
👉 मा. श्री. अविनाश भाऊ लांबट यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! 🎉


